शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : ...म्हणून काँग्रेसचा 'बीडीसी' निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 18:00 IST

काँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नेत्यांच्या सुटकेसाठी निर्णय घेतला. नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने याआधी बीडीसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली - केंद्र सरकराने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही नेत्यांना नजरकैद केले आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नेत्यांच्या सुटकेसाठी आता काँग्रेसने 'ब्लॉक डेव्हलपमेंट काउंसिल' (बीडीसी)च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने याआधी बीडीसी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता काँग्रेसने देखील स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले असल्याने हा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली आहे. 'स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केलेले असताना निवडणूक कशी घेतली जाऊ शकते. बीडीसी निवडणुकीची घोषणा करण्याअगोदरच निवडणूक आयोगाने स्थानिक राजकीय पक्षांशी चर्चा करायला हवी होती. जर सरकारने स्थानिक नेत्यांची मुक्तता केली असती तर आम्ही देखील निवडणुकीत सहभागी झालो असतो. मात्र आता आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत' असं गुलाम अहमद मीर यांनी म्हटलं आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये 24 ऑक्टोबर रोजी बीडीसीची निवडणूक होणार आहे. मोदी सरकार पक्षाला फायदा व्हावा यासाठीच बीडीसी निवडणूक घेत आहे. आमचे स्थानिक नेते नजरकैदेत आहेत. त्यामुळे आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत असं मीर यांनी म्हटलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या राजकीय नेत्यांची लवकरच सुटका केली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. तसेच ते त्यांची राजकीय कामे सुरू करू शकतील असं म्हटलं होतं.

राम माधव यांनी 'राज्यपाल राजवट उठवल्यानंतर विधिमंडळ सूत्रे हाती घेईल. त्यानंतर अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग, अल्पसंख्याक आयोग यांची स्थापना करण्यात येणार आहे. कलम 370 हा सत्तर वर्षांपासूनचा कर्करोग होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो दूर केला आहे. गेली अनेक वर्षे कायदा व सुव्यवस्था सुरळीत नसलेला हा भाग आता शांत असून दोनशे नेते नजरकैदेत आहेत. हजारो लोकांना अटक केल्याचा प्रचार खरा नाही. कायदा व सुव्यवस्थेसाठी दोनशे लोकांना नजरकैदेत ठेवण्यात काही गैर नाही. त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत नाही' असं म्हटलं होतं. तसेच 'पंचतारांकित हॉटेलमध्ये टीव्ही, पुस्तके, इतर सर्व सुविधा देत या नेत्यांची सोय करण्यात आली आहे. ती तात्पुरती व्यवस्था आहे. दोनशे लोक स्थानबद्ध असल्याने काश्मीरमध्ये शांतता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना स्थानबद्ध करणे किती महत्त्वाचे होते हे यातून लक्षात येते. त्यांना कायम कैदेत ठेवण्यात येणार नाही तर सोडून देण्यात येईल' असंही राम माधव यांनी म्हटलं होतं. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक