शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

'संकल्पपत्र' म्हणजे एका व्यक्तीची 'मन की बात', काँग्रेसची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 3:16 PM

संकल्पपत्रावरुन काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. 

नवी दिल्ली : आमागी लोकसभा निवडणुकीसाठीभाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव दिले आहे. भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने 'संकल्पपत्र' तयार केले आहे. दरम्यान, या संकल्पपत्रावरुन काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. 

काँग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की, "जाहीरनाम्याचा फोटो आम्हाला सांगतो की आमच्यासाठी देशातील लोक महत्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी फक्त आपला चेहरा. आमच्या जाहीरनाम्यात देशातील करोडो लोकांचे विचार आहेत. तर भाजपाच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच व्यक्तीची 'मन की बात'. आता देश आपल्या मनातील निर्णय ऐकवेल."

दरम्यान, आपल्या संकल्पपत्रात 2022 पर्यंत 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यावर विचार करुन 'संकल्पपत्र' तयार करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी 'संकल्पपत्र' प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.   

भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार - दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार-सिटीजनशिप विधेयक लागू करणार- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार- समान नागरी कायदा लागू करणार.- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध - 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार- कुपोषणाचा स्तर घटवणार- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार- नल सें जल यावर काम करणार- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक