Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 14:10 IST2024-10-08T14:03:23+5:302024-10-08T14:10:51+5:30
Congress Ashok Gehlot And Haryana Assembly Election Result : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठं विधान केलं आहे.

Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेदरम्यान राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठं विधान केलं आहे. हरयाणातील निकालाबाबत गेहलोत म्हणाले की, "शेवटी काँग्रेसचाच विजय होईल. राज्यात फक्त काँग्रेसच सरकार स्थापन करेल. ही विचारधारेची लढाई आहे."
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ८ ऑक्टोबरला जोधपूरहून जयपूरला जाण्याआधी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, "तोडाफोडीच्या राजकारणाचं युग संपलं आहे. हरयाणात काँग्रेसचं सरकार स्थापन होणार आहे. भाजपा बदला घेण्याच्या नीतीने काम करत आहे. काँग्रेस सरकारने कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केलं नाही."
तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा. आता वेळ गेली आहे, पूर्वी भाजपा सरकार फोडण्याचं काम करायची असंही ते म्हणाले. राजस्थानात त्यांचं तोडाफोडीचं राजकारण चाललं नाही. राजस्थानमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भाजपाची स्थिती आता कमकुवत झाली आहे. देशातील वातावरण आता बदललं आहे असंही गेहलोत यांनी सांगितलं. ५ ऑक्टोबर रोजी हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान झालं होतं. आता मतमोजणी सुरू आहे.