शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीला विरोध; २० विद्यार्थिनी, दोन चालकांवर हल्ला

By admin | Updated: March 5, 2015 23:49 IST

बोर्डाची परीक्षा देऊन परतणाऱ्या शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या बाईकस्वारांना विरोध करणाऱ्या दोन स्कूलबसचालकांवर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला़

मुजफ्फरनगर : बोर्डाची परीक्षा देऊन परतणाऱ्या शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या बाईकस्वारांना विरोध करणाऱ्या दोन स्कूलबसचालकांवर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला़ या हल्ल्यात स्कूलबसचे दोन्ही चालक आणि एक विद्यार्थिनी जखमी झाली़पोलीस अधीक्षक विजय भूषण यांनी गुरुवारी ही माहिती दिली़ काल सर्व विद्यार्थिनी कमलपूर केंद्रावर परीक्षा देऊन स्कूलबसने घरी पतरत होत्या़ यावेळी आठ बाईकस्वार युवकांनी कथितरीत्या बसमधील मुलींची छेड काढणे सुरू केले़ एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी या मुलींची बस अडवण्याचेही प्रयत्न केले़ स्कूलबसचे चालक संजय आणि वेदपाल यांनी या छेडछाड करणाऱ्या मुलांना विरोध केला़ यामुळे बाईकस्वार मुले संतापले व त्यांनी दोन्ही चालकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला़ यात दोघेही जखमी झाले़ युवकांनी बसवरही दगडफेक केली़ यात एक विद्यार्थिनीही जखमी झाली़याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश व विजय नामक दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे़ अन्य आरोपी फरार आहेत़ (वृत्तसंस्था)