शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील संघर्ष तूर्तास संपुष्टात

By admin | Updated: September 6, 2014 01:46 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दोन वेगवेगळी पत्रे जारी केली आणि याबरोबरच पक्षात उफाळलेल्या संघर्षाला पूर्णविराम लागला.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी दोन वेगवेगळी पत्रे जारी केली आणि याबरोबरच पक्षात नव्या आणि जुन्या पिढी दरम्यान उफाळलेल्या संघर्षाला पूर्णविराम लागला. कोणताही नेता सार्वजनिक मंचावरून अथवा मीडियाच्या माध्यमातून पक्षाला हानी पोहोचेल, अशाप्रकारची कोणतीही सूचना देणार नाही वा टिप्पणी करणार नाही, अशी ताकीद या दोन्ही पत्रतून देण्यात आली आहे.राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एकजूट होऊन वरिष्ठ नेत्यांवर खुर्ची सोडण्यासाठी दबाव आणणा:या सर्व सचिवांवरही हे र्निबध घालण्यात आले आहेत, हे विशेष. राहुल गांधी समर्थकांच्या या मोहिमेतील हवा काढण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या ‘व्हिटो पावर’चा मोठय़ा चतुराईने वापर केला आहे. 
द्विवेदी यांनी जारी केलेले पहिले पत्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध बिगुल फुंकून संघर्षाची सुरुवात करणा:या सर्व सचिवांच्या नावाने आहे. तर दुसरे पत्र सर्व सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष, कार्य समिती सदस्य, आघाडय़ांचे अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेत्यांच्या नावे जारी केले आहे. 
या दोन्ही पत्रत व्यर्थ व अनावश्यक वक्तव्य करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. आपले मत मीडियामार्फत व्यक्त करू नका, असा सल्ला सचिवांना देण्यात आला आहे. पक्ष सचिवांनी  द्विवेदी आणि दिग्विजयसिंग यांना याआधी पाठविलेल्या पत्रची प्रतही या पत्रसोबत जोडण्यात आली आहे, हे विशेष.द्विवेदींच्या या पत्रंमुळे काँग्रेसमध्ये उफाळलेला संघर्ष तात्पुरता शमला असल्याचे भासत असले तरी पक्ष संघटनेत युवा आणि वरिष्ठ नेत्यांमधील हा ‘जनरेशन गॅप’चा संघर्ष एवढय़ा सहजतेने थांबणार 
नाही, असे पक्षाच्या सूत्रंनी म्हटले आहे. काँग्रेसला नवसंजीवनी आणि नवे स्वरूप देण्यासाठी युवा नेत्यांना पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्त केले पाहिजे. कारण जुन्या नेत्यांसोबत त्यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आपल्या वयाच्या नेत्यांचीच संपूर्ण टीम तयार करण्याची राहुल गांधी यांची इच्छा आहे.