शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

India China FaceOff: चीनला अद्दल घडविण्याचे सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य; प्रसंगी सीमेवर गोळीबाराचीही मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:00 AM

दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गवलान खोऱ्यात सीमेवर गस्त घालणाºया २० भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी मारहाण करून ठार मारल्यानंतर यापुढे चीनने सीमेवर कोणतीही आगळिक केल्यास जराही गय न करण्याचा खंबीर पवित्रा भारताने घेतला आहे. यासाठी दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात तणातणी झाल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे बंधन यापुढे न पाळण्याचे भारकताने ठरविले असून वेळ पडल्यास सीमेवरील सैन्याला गोळीबार करण्याची मुभाही देण्यात आली आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तीन दिवसांच्या रशिया दौºयावर रवाना होण्याआधी रविवारी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन सीमेवरील ताज्या स्थितीचा आठवडाभरात दुसºयादा आढावा घेतला. या बैठकीत वरीलप्रमाणे कठोर धोरण ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडनिरल करमबीर सिग व हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदुरिया यांनी भाग घेतला. सूत्रांनुसार केवळ भूसीमेवरच नव्हे तर हवाई हद्दीत व सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सागरी मार्गांवर चीनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संर७णमंत्र्यांनी सैन्यदलांना दिल्या. सीमारक्षणाच्या बाबतीत भारताने खंबीर भूमिका घेतली असल्याने चीनच्या कोणत्याही दुस्साहसाला करारी प्रत्यत्तर देण्याचे सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, असेही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. भारत व चीनमध्ये सीमेसंबंधी सन १९९६ व २००५ मध्ये झालेल्या करारांनुसार सीमेवर सैन्यांमध्ये तणातणीची वेळ आल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे ठरले आहे. मात्र एका वरिष्ठ लष्करी अधिकाºयाने सांगितले की, आता दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. प्राप्त परिस्थिती हाताळण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे स्वातंत्र्य प्रत्यक्ष सीमेवर तैनात असलेल्या लष्करी कमांडरना देण्यात आले आहे.गवलान खोºयातील घटनेनंतर भारताने सैन्याच्या जादा तुकड्या सीमेवर तैनात केल्या असून हवाईदलानेही गेल्या पाच दिवसांत लेह व श्रीमगर खेरीज सीमेवरील महत्वाच्या तळांवर सुखोई ३० एमकेआय, जग्वार व मिराज २००० या प्रबळ लढाऊ विमानांसह अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरही रवाना केली आहेत.>शस्त्रे, दारुगोळा खरेदीचे सैन्यदलांना विशेष अधिकारसीमेवर मर्यादित अथवा पूर्ण क्षमतेच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी अत्यंत निकडीची अशी शस्त्रे व दारुगोळा तातडीने खरेदी करण्याचे विशेष वित्तीय अधिकारही सरकारने तिन्ही सैन्यदलांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यानुसार तिन्ही सैन्यदलांचे उपप्रमुख प्रत्येक वेळी 500 कोटी रुपयांपर्यंतची तातडीची खरेदी सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय करू शकतील. उरी येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरचे ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतरही सैन्यदलांना असे अधिकार देण्यात आले होते.

टॅग्स :chinaचीन