शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपासमोर आव्हानांचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 09:24 IST

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात जबरदस्त कामगिरी करत 80 पैकी 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र....

नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानेउत्तर प्रदेशात जबरदस्त कामगिरी करत 80 पैकी 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. मात्र यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत 2014 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. पण खासदारांनी केलेली निराशा, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न तसेच सपा आणि बसपाने केलेली महाआघाडीची घोषणा यामुळे आगामी निवडणुकीत 2014 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला आव्हानांचा डोंगर पार करावा लागणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासमोर पुढील आव्हाने असतील.गोवंशाची वाढलेली संख्या - गोहत्याबंदीमुळे उत्तर प्रदेशात गोवंशाची संख्या वारेमाप वाढली आहे. भटकी जनावरे शेतीचे नुकसान करत असून, त्यासाठी शेतकरी मोदी सरकारला दोषी ठरवत आहेत. त्यामुळे योगी सरकारने मोकाट जनावरांसाठी गोशाला बनवण्याची घोषणा केली आहे. मात्र ही समस्या न सुटल्यास मोदी सरकारला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.  खासदारांची अकार्यक्षमता - 2014 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे बहुतांश उमेदवार विजयी झाले होते. मात्र यापैकी बहुतांश खासदारांच्या कामावर त्यांच्या मतदारसंघातील जनता नाराज आहे. काही खासदारांनी निवडणुका आटोपल्यानंतर आपल्या मतदारसंघात तोंड दाखवलेले नाही. त्यामुळे भाजपाला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो.  फसलेली कर्जमाफी - उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळाल्यावर भाजपाने कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र या कर्जामाफीचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत.  पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद -  उत्तर प्रदेशमध्ये भाजपामधील काही नेते आणि सहकारी पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर ओमप्रकाश राजभर आणि अनुप्रिया पटेल हे मित्रपक्षांचे नेतेही नाराज आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करताना भाजपाची कसोटी लागणार आहे.  सवर्णांची नाराजी - भाजपाचे पारंपरिक मतदार मानले जाणारे सवर्णही भाजपावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे त्यांना सांभाळून घेताना भाजपाची कसोटी लागणार आहे. राममंदिर - उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर हा आजही मोठा मुद्दा आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने बहुमतासह सरकार बनवल्यावर आता राम मंदिरासाठी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र राम मंदिराबाबत नरेंद्र मोदी यांनी थेट भूमिका न घेता कोर्टाच्या निकालानंतर निर्णय घेऊ असे सांगितल्याने रामभक्तांची निराशा झाली आहे.सपा बसपा आघाडी - एकमेकांची प्रतिस्पर्धी असलेले सपा आणि बसपा आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. या आघाडीमुळे दलित, यादव आणि मुस्लिम यांची एकगठ्ठा मते सपा-बसपाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सपा बसपा आघाडी हे भाजपासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी