आमच्याकडे या, अन्यथा ईडीकडून केली जाईल अटक, भाजपने ‘निरोप’ पाठविल्याचा आतिशी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:14 AM2024-04-03T06:14:57+5:302024-04-03T06:15:36+5:30

Atishi News: आम आदमी पार्टीचे आतिशी सिंह, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा हे ‘जेन नेक्स्ट’ नेतेही आता ईडी आणि भाजपच्या रडारवर आले असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढच्या दोन महिन्यात त्यांना अटक केली जाईल, असा आरोप आज ‘आप’ने केला.

Come to us, otherwise arrest will be made by ED within a month, Atishi claims that BJP has sent a 'message' | आमच्याकडे या, अन्यथा ईडीकडून केली जाईल अटक, भाजपने ‘निरोप’ पाठविल्याचा आतिशी यांचा दावा

आमच्याकडे या, अन्यथा ईडीकडून केली जाईल अटक, भाजपने ‘निरोप’ पाठविल्याचा आतिशी यांचा दावा

 नवी दिल्ली  - आम आदमी पार्टीचे आतिशी सिंह, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा हे ‘जेन नेक्स्ट’ नेतेही आता ईडी आणि भाजपच्या रडारवर आले असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढच्या दोन महिन्यात त्यांना अटक केली जाईल, असा आरोप आज ‘आप’ने केला.

पहिल्या चार अव्वल नेत्यांना तुरुंगात डांबूनही आम आदमी पार्टी मोडकळीस येत नसल्याचे पाहून पंतप्रधान आणि भाजपने ‘आप’ आणि ‘आप’च्या सर्वच नेत्यांना पूर्णपणे तुडवून काढण्याचे मन बनवले आहे, असा दावा आतिशी सिंह यांनी आज केला. 

आपली राजकीय कारकीर्द वाचवायची आणि आणखी वाढवायची असेल तर तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा महिन्याभरात ईडीकडून अटक केली जाईल, असा निरोप भाजपने आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून पाठवला आहे.

‘महारॅलीमुळे भाजपची झोप उडाली आहे’
केजरीवाल यांच्या अटकेनंतर ‘आप’ची पक्ष संघटना मोडीत निघाली आहे, असा समज झाल्याने ‘आप’ने आयोजित केलेल्या महारॅलीत बडे नेते आणि लोक येतील यावर भाजप आणि माध्यमांचा विश्वास नव्हता. पण, ३१ मार्च रोजी भारतातील विरोधी पक्षांच्या सर्व बड्या नेत्यांनी या महारॅलीला हजेेरी लावलेली पाहून भाजपचे होश उडाले. 
आमच्यासारख्या कनिष्ठ नेत्यांनी ‘इंडिया’च्या सर्व बड्या नेत्यांना संपर्क करून निमंत्रित केले. आपला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व काही करूनही हा पक्ष अजूनही तेवढाच ताकदीने उभा असल्याचे बघून भाजप आणखीच चवताळला असून, आम्हाला अटक केली जाणार आहे, असा आरोप मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. 

आतिशी सिंह यांनी सांगितले, पुढे हे होणार 
- पुढच्या काही दिवसात आपल्या निवासस्थानी ईडी धाड घालेल.
- केवळ माझ्याच नाही तर माझे नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या घरांवर धाडी घातल्या जातील.
- त्यानंतर ईडीकडून आम्हा सर्वांना समन्स धाडले जातील.
- ईडीने समन्स पाठवल्यानंतर काही काळानंतर आम्हाला अटक केली जाईल.

अस्वस्थपणे येरझाऱ्या, डोळ्याला डोळा लागला नाही
अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातील पहिली रात्र अस्वस्थपणे घालविली. ते आपल्या बराकीत येरझाऱ्या घालताना दिसले. त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. काही काळासाठी ते जमिनीवर पडून होते. या बराकीत केजरीवाल टीव्ही संच उपलब्ध करून देण्यात आला आहे. झोपण्यासाठी गादी, पांघरूण आणि दोन उशा देण्यात आल्या आहेत.

असा आहे दिनक्रम
- रोज सकाळी साडेसहा वाजता उठणे
- चहा आणि ब्रेडचा नाष्टा
- सकाळी साडेदहा ते ११ वाजेपर्यंत सकाळचे भोजन
- भोजनानंतर ३ वाजेपर्यंत आपल्या कोठडीतच राहावे लागेल.
- साडेतीन वाजता चहा आणि दोन बिस्कीट देण्यात येतील.
- चार वाजता त्यांना वकिलांना भेटता येईल.
- साडेपाच वाजता रात्रीचे भोजन दिले जाईल
- रात्री सात वाजता कोठडीत परत जावे लागेल.

Web Title: Come to us, otherwise arrest will be made by ED within a month, Atishi claims that BJP has sent a 'message'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.