पिकअपची टक्कर; भीषण अपघातात बस पलटून 7 ठार

By हेमंत बावकर | Updated: October 17, 2020 08:48 IST2020-10-17T08:47:38+5:302020-10-17T08:48:29+5:30

Road Accident In Pilibhit: आज पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लखनऊहून येत असलेल्या पीलीभीत डेपोच्या बसला पिकअप चालकाने ठोकरले.

Collision of pickup; 7 killed in bus accident in Uttar Pradesh Pilbhit | पिकअपची टक्कर; भीषण अपघातात बस पलटून 7 ठार

पिकअपची टक्कर; भीषण अपघातात बस पलटून 7 ठार

उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये राष्ट्रीय महामार्ग-30 वर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बोलेरो पिक अप व्हॅन आणि परिवहन बसमध्ये हा अपघात झाला. पिकअपच्या चालकाला झोप आल्याने त्याने समोरून येणाऱ्या बसला धडक दिली. यामुळे ही बस पलटली आणि बसमधील ६ प्रवासी ठार झाले. तर पिकअपमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 


मिळालेल्या वृत्तानुसार आज पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लखनऊहून येत असलेल्या पीलीभीत डेपोच्या बसला पिकअप चालकाने ठोकरले. या धक्क्याने बस पलटली. या अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक महिला सहभागी आहे. 24 जखमींपैकी 8 जणांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा ह़ॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 


प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसमध्ये प्रवासी होते. तर पिकअपमध्येही काही लोक प्रवास करत होते. बसमधील 6 प्रवासी आणि पिकअपमधील एक असे 7 जण जागीच ठार झाले. पिकअपचा वेग खूप होता. या पिकअपच्या धक्क्याने बस पलटली. 

Web Title: Collision of pickup; 7 killed in bus accident in Uttar Pradesh Pilbhit