शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

महिलेच्या पोटातून काढली तब्बल 33.5 किलोची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 3:46 PM

शस्त्रक्रियेची नोंद गिनीज बुकमध्ये होण्याची शक्यता

कोईंबतूर: एका महिलेच्या अंडाशयातून तब्बल 33.5 किलोची गाठ काढण्यात आली आहे. या महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी होईल की नाही, याबद्दल डॉक्टरांना साशंकता होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होण्याची शक्यता आहे. कोईंबतूरच्या एका रुग्णालयात वसंता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऊटीच्या रहिवासी असणाऱ्या वसंता यांच्या पोटातून तब्बल 33.5 किलोची गाठ काढण्यात आली. शेतमजूर असलेल्या वसंता यांच्या पोटाचा आकार काही महिन्यांपासून वाढत होता. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर वेदना सुरू झाल्यानं त्यांनी औषधं घेण्यास सुरुवात केली. वेदना कमी होत नसल्यानं वसंता जवळच्या डॉक्टरकडे गेल्या. त्यांनी अंडाशयात ट्युमर असल्याचं वसंता यांना सांगितलं. पोटातील गाठ मोठी असल्यानं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पोटातील गाठ मोठी झाल्यानं त्यावेळी पोटात असह्य वेदना सुरू होत्या, असं वसंता यांनी सांगितलं. मला जेवणदेखील करता येत नव्हतं. इतकंच काय मला घरातील सहजसोपी कामंदेखील करता येत नव्हती, अशी माहिती वसंता यांनी शस्त्रक्रियेनंतर दिली. स्थानिक डॉक्टरनं शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यानंतर वसंता कोईंबतूरमधील एका रुग्णालयात गेल्या. तिथे डॉ. सेंथिल कुमार, डॉ. पीयूष, डॉ. अनीता आणि डॉ. सतीश कुमार या टीमनं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. वसंता यांच्या अंडाशयातून 33.5 किलोची गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी 3 तास लागले.  

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयTamilnaduतामिळनाडूdoctorडॉक्टर