शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाण उद्योग पुन्हा खुला

By admin | Updated: October 23, 2014 04:40 IST

कोळसा खाण उद्योगातील गेली ४२ वर्षांची सरकारी मक्तेदारी मोडीत काढत भारतात स्थापन झालेल्या खासगी कंपन्यांनाही यात प्रवेश देण्याचा धाडसी निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली: कोळसा खाण उद्योगातील गेली ४२ वर्षांची सरकारी मक्तेदारी मोडीत काढत भारतात स्थापन झालेल्या खासगी कंपन्यांनाही यात प्रवेश देण्याचा धाडसी निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.१९९३ ते २०१३ या २० वर्षांच्या काळात केले गेलेले २१६ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केल्यानंतर या खाणींचे वाटप लिलावाद्वारे करण्याविषयीचा वटहुकूम राष्ट्रपतींनी मंगळवारी जारी केला. त्यात या लिलावामध्ये खासगी कंपन्यांनाही सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे. स्पर्धात्मक निविदा भरणारी कंपनी भारतात स्थापन झालेली असावी, एवढीच त्यात अट आहे. यामुळे कालांतराने जगातील दिग्गज कोळसा खाण कंपन्याही भारतात स्वतंत्र सहयोगी कंपनी स्थापन करून या उद्योगात येतील, असे मानले जात आहे.भारतात व्यापारी तत्त्वावरील कोळसा खाणींना सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे. मात्र ४२ वर्षांपूर्वी कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण केले गेल्यानंतर कोल इंडिया लि. या सरकारी कंपनीची मक्तेदारी आहे. मध्यंतरी या मक्तेदारीत थोडी शिथिलता आणून वीज, पोलाद व सिमेंट उत्पादक कंपन्यांना स्वत:च्या वापरासाठी कोळसा खाणी चालविण्यास परवानगी दिली गेली. मात्र आता हे दार आणखी उघडण्यात आले असून केवळ स्वत:च्या वापरासाठी नव्हे तर व्यापारी तत्वावर कोळसा विकण्यासाठीही खासगी कंपन्यांना कोळसा खाणी चालविता येतील.वटहुकुमात कोळसा खाणपट्ट्यांचे तीन वर्गांत वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या वर्गात २०४ खाणपट्टे असून त्यांच्यासाठी खासगी कंपन्याही स्पर्धा करू शकतील. दुसऱ्या वर्गात ४२ खाणपट्टे असून ज्यांचे पूर्वीचे वाटप रद्द झाले अशा कंपन्या, वाढीव शुल्क भरून, हे खाणपट्टे पुन्हा घेऊ शकतील. तिसऱ्या वर्गातील ३२ खाणपट्टे वीज, सिमेंट व पोलाद उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना, स्वत:च्या वापरासाठी कोळसा काढण्यासाठी, स्पर्धात्मक बोली मागवून दिले जातील.ई-लिलावाने या सर्व कोळसा खाणपट्ट्यांचे फेरवाटप येत्या चार महिन्यांत पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)