शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

योगी अमित शाहांना भेटले, नड्डा मोदींकडे पोहोचले; दिल्लीत राजकीय 'धुरळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 19:22 IST

CM Yogi Adityanath Delhi Visit: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही बैठक विशेष मानली जात आहे. उद्या योगी या दोन्ही नेत्यांना भेटतील.

ठळक मुद्देयोगी उद्या सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान मोदी यांना, तर 12:30 वाजता जेपी नड्डा यांना भेटतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.एनडीएचा घटक पक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनीही आज गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले. ते येथे केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. उद्या सकाळी 10:45 वाजता ते पंतप्रधान मोदी यांना, तर 12:30 वाजता जेपी नड्डा यांना भेटतील. आज मुख्यमंत्री योगींनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. (CM Yogi Adityanath delhi visit PM Narendra Modi Amit shah JP Nadda meeting)

यातच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही बैठक विशेष मानली जात आहे. उद्या योगी या दोन्ही नेत्यांना भेटतील. मात्र, यापूर्वीच जेपी नड्डा पंतप्रधानांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

योगींनी घेतली अमित शाहंची भेट - दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी दिल्लीतील युपी भवनात गेले. येथे काही वेळ थांबल्यानंतर, ते गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्थानी गेले. येथे दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास चर्चा झाली. ते उद्या पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. सांगण्यात येते, की भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर उत्तर प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरेल. याच बरोबर उत्तर प्रदेश संघटन आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही चर्चा होऊ शकते. याच वेळी एके शर्मा यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो.

दिल्लीश्वरांसमोर योगी आदित्यनाथांनी दंड थोपटले, पुढे...?

अनुप्रिया पटेल यांनीही घेतली शाहंची भेट - एनडीएचा घटक पक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनीही आज गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर, खासदार अनुप्रिया पटेल यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक झाली. या बैठकीकडेही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टाने पाहिले जात आहे.

रात्री उशिरापर्यंत स्वतंत्रदेव सिंह आणि सुनील बंसल यांच्याशी बैठक -सीएम योगी आदित्यनाथ यांनी कल लखनौ येथे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि संघटनमंत्री सुनील बंसल यांच्यासोबत बैठक केली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, ही दर महिन्याला होणारी रुटीन बैठक होती, असे सांगण्यात आले. पण, या बैठकीसाठी सुनील बंसल हे हेलीकॉप्टरने लखनौला पोहोचले होते.

दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'

ही बैठक आणि सध्या लावले जात असलेले राजकीय कयास, यांसंदर्भात माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीला गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय, गेल्या एक महिन्यातील घटनाक्रमासंदर्भात बोलायचे झाल्यास उत्तर प्रदेश भाजपमध्ये विविध प्रकारच्या राजकीय कयासांना उधान आले आहे. यातच नुकताच, भाजप आणि आरएसएसच्या काही मोठ्या नेत्यांनीही लखनौ दौरा केला आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश