सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 14:55 IST2020-07-24T14:51:47+5:302020-07-24T14:55:06+5:30

अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत. 

cm ashok gehlot demands to governor kalraj mishra for assembly session | सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

ठळक मुद्देराजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे.

जयपूर -राजस्थानचा राजकीय संघर्ष आता राज्यपालविरुद्ध मुख्यमंत्री, असे वळ घेताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतांनी सांगितले, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यपालांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता वृत्त आले आहे, की राज्यपाल कलराज मिश्र यांनी कोरोनाचा हवाला देत विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी म्हटले आहे, की सध्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे आमदार कोरोना कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत. अशात विधानसभा अधिवेशन बोलावणे योग्य ठरणार नाही. अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत. 

अशा स्थितीत, तत्काळ विधानसभा अधिवेश बोलावण्याच्या आणि बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्द्यावरून, अशोक गेहलोत सरकार सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्या राज्यपालांकडून विधानसभा अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

अशोक गेहलोत आक्रमक -
अशोक गेहलोत म्हणाले, "आम्ही राज्यपालांना म्हणालो आहोत, की त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलावले नाही, तर आम्ही  सर्व आमदारांना घेऊन त्यांच्याकडे येऊ आणि अधिवेशन बोलावण्याची मागणी करू. मात्र, यावर राज्यपालांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

केंद्र सरकारकडून राज्यपालांवर दबाव टाकला जातोय - 
शुक्रवारी पत्राकर परिषदेत बोलताना अशोग गेहलोत म्हणाले, होते, की राज्यपालांवर केंद्र सरकारकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी कुणाच्याही दबावात यायला नको. एवढेच नाही, तर राज्यातील जनतेने संतप्त होऊन राजभवनाला घेराव घातला, तर आपली जबाबदारी नसेल, असेही गेहलोतांनी म्हटले होते.

...आणि सर्व गोष्टी जनतेच्या समोर येतील. 
मुख्यमंत्री गेहलोतांनी दावा केला आहे, की त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे अधिकवेशन बोलवावे. या अधिवेशनात राज्यातील संकटाबरोबरच या संकटावरही चर्चा होईल आणि सर्व गोष्टी जनतेच्या समोर येतील. 

महत्त्वाच्या बातम्या -

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

CAAचा फायदा घेण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम करताहेत धर्मांतर, 'या' धर्माचा करत आहेत स्वीकार, सरकार अलर्ट!

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

Web Title: cm ashok gehlot demands to governor kalraj mishra for assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.