शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाखमध्ये ढगफुटी; १६ ठार, बेपत्ता लोकांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 07:27 IST

अनेक घरांसह पिकांचे, लघु विद्युत केंद्रांचे नुकसान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दूरवर्ती गावात पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ढगफुटी झाली

ठळक मुद्देपर्वतीय राज्यात अचानक आलेल्या पुरात ९ जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता आहेत.मंगळवारी संग्रा आणि खंग्राल या भागातील ढगफुटीत जीविहानी झाली नाहीकिश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीने नाल्याकाठची १९ घरे,  गाईचे २१ गोठे आणि धान्य गोदामाचे नुकसान झाले

शिमला/जम्मू : हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये  बुधवारी झालेल्या ढगफुटीने आलेल्या जोरदार पुराच्या तडाख्याने १६ लोकांचा मृत्यू झाला.  अनेक घरांचे, उभ्या पिकांचे आणि लघु विद्युत केंद्राचे अतोनात नुकसान झाले.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील दूरवर्ती गावात पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ढगफुटी झाली. यात ७ जण ठार, अन्य १७ जण जखमी झाले, तर या पर्वतीय राज्यात अचानक आलेल्या पुरात ९ जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता आहेत.लडाखमध्ये कारगिलच्या विविध भागात झालेल्या ढगफुटीच्या घटनेने एका लघु विद्युत केंद्राचे, बाराहून अधिक घरांचे आणि  उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी संग्रा आणि खंग्राल या भागातील ढगफुटीत जीविहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाल्याकाठच्या १९ घरांचे प्रचंड नुकसान

किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीने नाल्याकाठची १९ घरे,  गाईचे २१ गोठे आणि धान्य गोदामाचे नुकसान झाले. होन्जर गावात ढगफुटी झालेल्या भागातील चौदाहून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीने झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गृहमंत्री अमित शहा यांंनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि पोलिस महासंचालक दिलबाग सिंंग यांच्याकडून स्थितीचा आढावा घेतला.

हिमाचलमध्ये ७ जणांचा मृत्यू, सात बेपत्ता... सतर्कतेचा इशारा जारी

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीतमधील  उदयपूरस्थित टोंझिंग नाल्याच्या पुरात सात जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तीन जण बेपत्ता आहेत. दरम्यान, चम्बामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितले. कुल्लू जिल्ह्यात एक महिला, तिचा मुलगा, जलविद्युत केंद्राचा एक अधिकारी  आणि दिल्लीच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास लाहौल-स्पितीमधील उदयपूरमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर अचानक पूर आला.  दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होत आहे. शिमला हवामान केंद्राने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

टॅग्स :floodपूरJammu Kashmirजम्मू-काश्मीर