शिक्षकांच्या वेतनातील कपात बंद करा

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:56+5:302015-02-18T00:12:56+5:30

नागपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून करण्यात येत असलेली गैरशासकीय कपात बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Close the teacher salary deduction | शिक्षकांच्या वेतनातील कपात बंद करा

शिक्षकांच्या वेतनातील कपात बंद करा

गपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून करण्यात येत असलेली गैरशासकीय कपात बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिक्षकांची शालार्थ वेतनातून कपात न करता राष्ट्रीयकृत बँकेच्या वेतन खात्यातून परस्पर नगदी अथवा ईसीएसद्वारे भरणा करण्यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. गैरशासकीय संस्था, बँका व पतसंस्था आदींची वेतनातून कपात बंद करण्यासंदर्भात निर्देश देण्याचे आश्वासन जोंधळे यांनी दिले. त्यामुळे शिक्षकांना जिल्हा बँकेच्या कर्जाचे हप्ते नगदी स्वरूपात भरता येतील, अशी माहिती संघटनेचे शरद भांडारकर यांनी दिली. शिष्टमंडळात भांडारकर यांच्यासह संजय चामट, मनोज घोडके, नंदकिशोर उजवणे, नारायण पेठे, सुनील नासरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Close the teacher salary deduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.