शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ प्रतिमेच्या फडणवीसांचे संघाला साकडे

By admin | Updated: October 29, 2015 22:02 IST

अनिकेत घमंडी

अनिकेत घमंडी
डोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वच्छ प्रतिमा हा महापालिका निवडणुकीचा मुद्दा केला आहे. बुधवारच्या कल्याण-डोंबिवलीतील सभेत शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतानाच उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिमेकडे पाहून मतदान करण्याचे साकडे घातले. आपण स्वत: स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत संघ स्वयंसेवकांना मागील निवडणुकीत केला तसा दगाफटका न करण्याची आर्त साद फडणवीस यांनी घातली. मुख्यमंत्र्यांनी भर सभेत स्वयंसेवक कसा असतो, हे सांगताना राष्ट्रभक्ती, बलिदान, त्याग आणि स्वच्छ-पारदर्शी कारभार या चतु:सूत्रीचा पुनरुच्चार केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी हे आमचे आदर्श असल्याचेही सांगितले. अर्थात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्याचा संघ कार्यकर्त्यांवर कती परिणाम होईल व त्यांची नाराजी किती दूर होईल, ते मतदानाच्या दिवशी कळेलच. तसेच निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल. किंबहुना, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संघ स्वयंसेवकांची केलेली मिनतवारी कामी आली नाही तर महापालिकेतील पायाभूत सुविधांचा बोजवारा व आपली स्वच्छ प्रतिमा या दोन मुद्द्यांची जोड मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रचाराला दिली.
या वेळेस प्रथमच महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चार वेळा तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन सभा घेत आहेत. उद्या (शुक्रवारी) प्रचाराची सांगता होणार आहे, पण त्या आधी दुपारपर्यंत मुख्यमंत्री आणि ठाकरे हे दोघेही महापालिका प्रचाराचे कुरुक्षेत्र लढवणार आहेत. अर्थात, मुख्यमंत्री स्वत: लढाईत उतरल्याने या निवडणुकीत फडणवीसविरुद्ध ठाकरे असा रंग भरला गेला. त्यामुळे निवडणुकीनंतर उभयतांचे संबंध कसे राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
...................