7 वीच्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 11:32 IST2018-02-22T11:29:21+5:302018-02-22T11:32:51+5:30

शिक्षिकेची मुलगी आणि धमकी देणारा विद्यार्थी एकाच वर्गात शिकतात

Class 7 student threatens to rape teacher, daughter online | 7 वीच्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी

7 वीच्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला आणि तिच्या मुलीला बलात्काराची धमकी

गुरूग्राम : इयत्ता सातवीत शिकणा-या एका विद्यार्थाने आपल्या शिक्षिकेला आणि तिच्या मुलीलाच बलात्काराची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन पोस्ट अपलोड करून त्याने धमकी दिली आहे. गुरूग्राम  येथील एका ख्यातनाम शाळेतील ही घटना आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिक्षिकेची मुलगी आणि धमकी देणारा विद्यार्थी एकाच वर्गात शिकतात अशी माहिती आहे. दुस-या एका घटनेत याच शाळेच्या आणखी एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला इमेलद्वारे 'कॅन्डललाइट डेट' आणि सेक्ससाठी विचारणा केली. या दोन्ही घटना गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.
या घटनेनंतर ती शिक्षिका आणि तिची मुलगी प्रचंड घाबरली असून मुलीने शाळेत येणं बंद केलं आहे. शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थ्याची ओळख खासगी ठेवण्यासाठी शाळेने त्यांची नावं जाहीर केलेली नाहीत. प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर शाळेने तिया विद्यार्थ्यावर कठोर कारवाई केली असून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. 
ही घटना समोर आल्यानंतर अन्य एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही केवळ एका शाळेतील घटना नाही असं म्हटलं आहे. अल्पवयीन मुलांकडून होणा-या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आई-वडिलांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.आई-वडील दोघं कामावर जात असल्यामुळे मुलांचे विचार नकारात्मक झाले आहेत. शाळांमध्ये समुपदेशन व्हायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

Web Title: Class 7 student threatens to rape teacher, daughter online