चंद्रचूड यांची कार भारीच, त्यापेक्षा तिचा नंबर लय भारी! एवढे काय आहे खास, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:41 AM2024-02-19T11:41:34+5:302024-02-19T11:43:28+5:30

CJI DY Chandrachud car Number: रविवारी दुपारी एका व्यक्तीने त्यांच्या कारचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो वाऱ्यासारखा पसरला आहे.

CJI DY Chandrachud's car is VIP, its number is Special than that! Find out what is it | चंद्रचूड यांची कार भारीच, त्यापेक्षा तिचा नंबर लय भारी! एवढे काय आहे खास, जाणून घ्या

चंद्रचूड यांची कार भारीच, त्यापेक्षा तिचा नंबर लय भारी! एवढे काय आहे खास, जाणून घ्या

देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या गाडीचा नंबर व्हायरल होत आहे. चंद्रचूड यांच्याकडे कोणती कार आहे यापेक्षा त्यांच्या कारचा नंबर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. रविवारी दुपारी एका व्यक्तीने त्यांच्या कारचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो वाऱ्यासारखा पसरला आहे. असे काय आहे चंद्रचूड यांच्या कारच्या नंबरमध्ये...

डी वाय चंद्रचूड यांच्या कारचा नंबर DL1 CJI 0001 असा आहे. सरनायाधीशांच्या इंग्रजीतील पदनामाचा शॉर्टफॉर्म हा सीजेआय आहे. दिल्लीतील एका खासगी कार्यक्रमाला चंद्रचूड त्यांच्या कारने गेले होते. लॉयड मथिआस नावाच्या व्यक्तीने हा फोटो पोस्ट करत किती कूल... मुख्य निवडणूक आयुक्तांच्या गाडीचा नंबर DL1 CEC 0001 असता तर किती चांगले झाले असते, असे म्हटले आहे. 

चंद्रचूड यांच्याकडे Mercedes E 350D ही कार आहे. ही कार चंद्रचूड यांची नसून ती सर्वोच्च न्यायालयाच्या मालकीची आहे. या कारची किंमत ८८ लाख रुपये आहे व ती चार रंगांमध्ये उपलब्ध असते. 

Web Title: CJI DY Chandrachud's car is VIP, its number is Special than that! Find out what is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.