शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Nagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 10:54 IST

Nagaland Firing : उच्च स्तरीय चौकशी केली जाणार असल्याची गृहमंत्री अमित शाह यांची मागणी.

Nagaland Firing : भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्याच्या मोन जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात किमान ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली. गाडीमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांच्या जवानांनी कथितरित्या त्यांच्यावर गोळीहार केला आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला.या वृत्ताला नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी दुजोरा दिला. तसंच या घटनेची निंदा करत त्यांनी लोकांता शांतता राखण्याचं आवाहन केलं. याशिवाय या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. "नागालँडमध्ये घडलेल्या घटनेचं दु:ख आहे. ज्या लोकांचा यात मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेचा तपास करणार आहे," अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी ट्विटरद्वारे दिली.  "मोन ओटिंगच्या नागरिकांची हत्या ही अतिशय दुर्देवी आणि नींदनीय घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती आहे. यात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर चांगली होईल अशी प्रार्थना करतो. उच्चस्तरीय एसआयटी या प्रकरणाचा तपास करेल आणि कायद्यानुसार न्याय दिला जाईल. सर्वांनी शांतता राखण्याचं मी आवाहन करत आहे," असं नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

टॅग्स :FiringगोळीबारAmit Shahअमित शाह