जानेवारी महिन्याच्या अखेरीस एका भीषण विमान अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर देशातील विमान प्रवासामधील सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला होता. दरम्यान, आता भारतातील नागरी हवाई क्षेत्रामधील सुरक्षेबाबत संसदीय समितीने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या एक वर्षामध्ये ऑडिट करण्यात आलेल्या सुमारे ५० टक्क कमर्शियल विमानांमध्ये वारंवार तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. जानेवीरी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान तपासण्यात आलेल्या ७५४ विमानांपैकी ३७७ विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक समस्या दिसून आल्या. नागरी हवाई वाहतूक विभागाबाबत स्थायी समितीच्या नव्या अहवालातील निष्कर्षांनंतर आता देशातील हवाई सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमुलाग्र सुधारणा करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
या अहवालानुसार इंडिगोच्या सर्वाधिक विमानांची तपासणी करण्यात आली. तसेच तांत्रिक त्रुटींच्या बाबतही हीच कंपनी पलिल्या क्रमांकावर राहिली. या कंपनीच्या ३ फेब्रुवारीपर्यंत तपासण्यात आलेल्या ४०५ विमानांमधील १४८ विमानांमध्ये वारंवार त्रुटी दिसून आल्या.
या रिपोर्टनुसार एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ताफ्यामधील विमानांमध्येही मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड दिसून आले. एअर इंडियाच्या १६६ विमानांपैकी १३७ विमानांमध्ये, आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या १०१ विमानांपैकी ५४ विमानाममध्ये सातत्याने तांत्रिक समस्या आढळून आल्या. या ऑडिटमध्ये समोर आलेल्या एकूण दोषांपैकी निम्मे तांत्रिक बिघाड हे या दोन विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये आढळून आले आहेत, असे समितीने सांगितले आहे. तसेच या समितीने मोठ्या प्रमाणावरील तांत्रिक त्रुटींबाबत चिंता व्यक्त करत यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि विमान उड्डाणांच्या विश्वसनीयतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
एका रिपोर्टनुसार सुरक्षा नियमांच्या उल्लघनाबाबत डीजीसीए विमान कंपन्यांवर कारवाईदेखील करू शकते. या संदर्भात एकट्या एअर इंडियाला ९ कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर २०२५ च्या अखेरीपर्यंत विविध विमान कंपन्यांना मिळून एकूण १९ नोटिस बजावण्यात आल्या आहेत.
Web Summary : A parliamentary panel reveals that over half of India's commercial planes, 377 out of 754, have recurring technical issues. Indigo tops the list, followed by Air India. The committee expressed concerns about passenger safety and flight reliability.
Web Summary : संसदीय पैनल का खुलासा: भारत के आधे से अधिक वाणिज्यिक विमान, 754 में से 377, तकनीकी रूप से खराब हैं। इंडिगो शीर्ष पर, फिर एयर इंडिया। समिति ने यात्री सुरक्षा और उड़ान विश्वसनीयता पर चिंता व्यक्त की।