शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासी शिंकांनी बेजार

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

शहरवासी शिंकांनी बेजार

शहरवासी शिंकांनी बेजार
-शासकीयसह खासगी रुग्णालयात : ३० ते ४० टक्के सर्दीचे रुग्ण

नागपूर : बहुसंख्य शहरवासी शिंका, सर्दीने बेजार झाले आहेत. सर्दी हा तसा साधा आजार असला तरी दहांमधून दोघांना हा आजार दिसून येतो. नाक बंद होणे, शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, डोके दुखणे, ताप येणे, घसा दुखणे अशाही तक्रारीच्या रुग्णांची टक्केवारी शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयात ३० ते ४० टक्के आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ईएनटी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले, गारठा वाढताच सर्दीचा त्रास वाढतो. नाकात धूळ गेली, तीव्र वास आला की व्यक्तीला एखाद दुसरी शिंक येते, नंतर थोडा वेळ नाकातून पाणी आल्यासारखेही वाटते, नाकात खाज सुटते किंवा कधी नाक बंद होते. नाकात जे काही गेले आहे, त्याला मिळणारा हा सर्वसाधारण प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद वाढीव स्वरूपात दिसू लागला तर त्याचे रूपांतर ॲलर्जिक सर्दीत होते. सद्यस्थितीत वातावरणातील बदलांमुळे सर्दीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गरम हवेतून गार हवेत जाण्यामुळे किंवा अगदी सकाळी उठल्यानंतर वातावरणात जो बदल जाणवतो त्यामुळेही काही व्यक्तींना सर्दी होते. सर्दीचा दुसरा प्रकार म्हणजे जंतूसंसर्गामुळे होणारी सर्दी. यातही वेगवेगळ्या विषाणूंमुळे होणारी सर्दी (कॉमन कोल्ड) आणि जीवाणू संसर्गामुळे होणारी सर्दी, असे दोन प्रकार आढळतात. एकदा विषाणूसंसर्गामुळे सर्दी झाल्यानंतर शरीरात त्या विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते. पण दर एक किंवा दोन महिन्यांनी विषाणू आपले आवरण बदलत असल्यामुळे एक-दोन महिन्यांनी पुन्हा सर्दी होण्याची शक्यता उद्भवते. ऱ्हायनोव्हायरस, एन्फ्लुएन्झा व्हायरस, ऑडिनोव्हायरस अशा विविध विषाणंूमुळे ही सर्दी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्दीवर वेगवेगळे उपचार आहेत. प्रत्येक रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार करणे आवश्यक आहे.