शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Citizenship Amendment Bill: लोकसभेत पाठिंबा, राज्यसभेत बहिष्कार; सेनेच्या बदललेल्या भूमिकेबद्दल राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:12 PM

राज्यसभेत वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे.

राज्यसभेत वादळी चर्चेनंतर अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे. विशेष म्हणजे या राज्यसभेत शिवसेनेच्या भूमिकेकडेच सर्वांच लक्ष होतं. विधेयकांवर राज्यसभेत चर्चा सुरू झाल्यावर सुरुवातीला संजय राऊतांनी शाहांना टोले लगावले होते, त्यानंतर शिवसेनेनं सभात्याग केल्यानं भाजपासाठी एक प्रकारे मैदान मोकळं करून दिलं. त्यानंतर शिवसेनेनं केलेल्या सभात्यासंदर्भात राऊतांना विचारले असता, त्यांनी शिवसेना कोणतीही भूमिका घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं सांगितलं आहे. आम्ही स्वतंत्र राजकीय पक्ष आहोत. आपली स्वतःची वेगळी भूमिका आहे. आमच्या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.तत्पूर्वी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन वारंवार भूमिका बदलणारी शिवसेना राज्यसभेत नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधारी भाजपाला झाला. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानं बहुमताचा आकडा खाली आला. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं 125, तर विरोधात 105 खासदारांनी मतदान केलं. याआधी शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. तर सामनामधून विधेयकावर जोरदार टीका केली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक