विमानतळावर वृद्धाला हृदयविकाराचा झटका, CISF अधिकाऱ्याने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 02:30 PM2022-12-21T14:30:11+5:302022-12-21T14:30:53+5:30

अहमदाबाद विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर आली आहे.

cisf sub inspector saved senior citizen life through cpr ahmedabad | विमानतळावर वृद्धाला हृदयविकाराचा झटका, CISF अधिकाऱ्याने वाचवला जीव

विमानतळावर वृद्धाला हृदयविकाराचा झटका, CISF अधिकाऱ्याने वाचवला जीव

Next

अहमदाबाद विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अचानक विमानतळावर एका 65 वर्षीय व्यक्तीला  हृदयविकाराचा झटका आला, यावेळी वेळीच घटनास्थळी दाखल होत एका सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. 

नारायण चौधरी (६५) हे मंगळवार २० डिसेंबर रोजी अहमदाबादहून हैदराबादला निघाले होते. विमानतळावर त्यांची सुरक्षा तपासणी केली, यानंतर ते फ्लाइटची वाट पाहू लागले. यानंतर अचानक त्यांना अस्वस्थता जाणवली आणि ते बेशुद्ध पडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. यावेळी घटनास्थाळी उपस्थित असलेल्या एका CISF अधिकाऱ्याने वेळीच उपचार करुन जीव वाचवला.


 
ही घटना अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. कपिल राघव येथे सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक म्हणून तैनात आहेत. 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना एक वृद्ध व्यक्ती अचानक बेशुद्ध झाल्याचा तातडीचा ​​फोन आला. अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला सीपीआर दिला. वृद्ध प्रवाशाला नंतर रुग्णवाहिकेतून अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या मदतीसाठी सीआयएसएफचे अधिकारी त्यांच्यासोबत होते. या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. 

INS Arnala: शत्रुच्या नजरेत न येणारी 'सायलेंट शिप'; नौसेनेत सामील झाली INS अर्नाला, पाहा Photos...

सीआयएसएफने या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. सोशल मीडियावर नेटकरी CISF अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत.

CPR म्हणजे काय?

CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन. ही एक आपत्कालीन प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदय थांबल्यास त्याचे प्राण वाचविण्यात मदत करू शकते. हृदयविकाराचा झटका किंवा रस्ता अपघात किंवा विजेचा धक्का यांसारख्या मोठ्या आघात यांसारख्या परिस्थितीत CPR दिला जातो. 

Web Title: cisf sub inspector saved senior citizen life through cpr ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.