INS Arnala: शत्रुच्या नजरेत न येणारी 'सायलेंट शिप'; नौसेनेत सामील झाली INS अर्नाला, पाहा Photos...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 02:11 PM2022-12-21T14:11:40+5:302022-12-21T14:14:07+5:30

INS Arnala: या युद्धनौकेला 'सायलेंट शिप' म्हटले जाते. या युद्धनौकेच्या नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांशी एक खास संबंध आहे.

INS Arnala: Stealth Warship; INS Arnala Joins Navy, See Photos... | INS Arnala: शत्रुच्या नजरेत न येणारी 'सायलेंट शिप'; नौसेनेत सामील झाली INS अर्नाला, पाहा Photos...

INS Arnala: शत्रुच्या नजरेत न येणारी 'सायलेंट शिप'; नौसेनेत सामील झाली INS अर्नाला, पाहा Photos...

Next

Indian Navy: भारतीय नौसेनेचे ताकत आता आणखी वाढणार आहे. देशातील पहिला अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वाटर क्राफ्ट INS अर्नाला लॉन्च झाली आहे. मंगळवारी संरक्षण मंत्रालयातील आर्थिक सल्लागार रसीका चौबे यांनी INS अर्नाला या युद्धनौकेला लॉन्च केले यावेळी जीआरएसई, भारतीय सशस्त्र दल आणि एलएंडटीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. INS अर्नालाचे निर्माण गार्डनरीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स लिमिटेड (GRSE) ने केले आहे.

या युद्ध नौकेला 'सायलेंट शिप' म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, या युद्धनौकेचा पाण्यात आवाज येत नाही. किनारपट्टीवर पेट्रोलिंग करणे किंवा शत्रुच्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्यात या युद्धनौकेची खूप मदत होईल. या युद्धनौकेचा आवाज येत नसल्यामुळे शत्रुलाही याची चाहूल लागणार नाही. ही युद्धनौका गुपचूप येऊन आपले काम करुन निघून जाईल.

INS अर्नालाचे वैशिष्ट्ये:-

-INS अर्नालाची लांबी 77.6 मीटर आणि रुंदी 10.5 मीटर आहे.

-शोध आणि हल्ला करण्यासाठी ही एकदम योग्य आहे.

-नेव्ही आणि एअरफोर्सच्या एअरक्राफ्ट्ससोबत ताळमेळ बसवण्यात आणि अँटी-सबमरीन ऑपरेशन्स करण्यास सक्षम.

-कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम आणि हलके टॉरपीडोस, अॅँटी-सबमरीन रॉकेट्सने युक्त.

-यावर 7 अधिकाऱ्यांसह 57 नौसैनिक तैनात होणार.

-47 किलोमीटर प्रतितास वेगाने चालण्यास सक्षम.

-याचे नाव महाराष्ट्रातील वसईपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'अर्नाला' बेटाच्या नावावर ठेवले आहे. या बेटाला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड म्हटले जाते.

अजून 16 तयार होणार
विशेष म्हणजे, नौसेना अशाप्रकारच्या 16 कॉर्वेट्स तयार करत आहे. या सर्व नौका 2026च्या अखेरपर्यंत तयार होऊ शकतात. यांना तयार करण्यासाठी 12,662 कोटी रुपये लागतील. सध्या भारताकडे कमोर्ता क्लास, कोरा क्लास, खुकरी क्लास, वीर क्लास आणि अभय क्लासच्या एकूण 22 कॉर्वेट्स आहेत.

Web Title: INS Arnala: Stealth Warship; INS Arnala Joins Navy, See Photos...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.