Cipla ची कोरोना टेस्ट कीट Viragen लाँच; 'या' तारखेपासून सुरू होणार पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:51 PM2021-05-20T12:51:55+5:302021-05-20T12:56:48+5:30

Cipla Coronavirus Kit : दिग्गज कंपनी सिप्लानं आपलं कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेलं टेस्टिंग कीट लाँच केलं आहे. 

Cipla launches polymerase chain reaction test kit ViraGen for Covid 19 available from 25th may | Cipla ची कोरोना टेस्ट कीट Viragen लाँच; 'या' तारखेपासून सुरू होणार पुरवठा

Cipla ची कोरोना टेस्ट कीट Viragen लाँच; 'या' तारखेपासून सुरू होणार पुरवठा

Next
ठळक मुद्दे दिग्गज कंपनी सिप्लानं आपलं कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेलं टेस्टिंग कीट लाँच केलं आहे. ICMR कडून होम टेस्टिंग कीटला मंजुरी

दिग्गज कंपनी सिप्लानं (Cipla) आपली कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेलं टेस्टिंग कीट लाँच केलं आहे. कोरोना विषाणूच्या टेस्टिंगबाबतचा कंपनीचा हा तिसरा प्रोडक्ट आहे. सिप्लानं गुरूवारी आपल्या RT-PCR टेस्ट कीट Viragen च्या कमर्शिअलायझेशनची घोषणा केली. कंपनीनं यासाठी Ubio Biotechnology Systems सोबत करार केला आहे. या टेस्टिग कीटचा पुरवठा २५ मेपासून सुरू होणार आहे. "या लाँचमुळे देशात टेस्टिंग सर्व्हिसेस आणि त्याच्या कॅपॅसिटीशी निगडीत असलेल्या आव्हानांचा सामना करण्यास मदत मिळेल. याशिवाय डायग्नोस्टिक स्पेसमध्ये कंपनीचा विस्तारही होईल," असं सिप्लानं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे.
 
Viragen टेस्ट कीट Ubio Biotechnology Systems च्या भागीदारीसह लाँच केलं जाईल. तसंच याचा पुरवठा २५ मे पासून करण्यात येईल असं सिप्लानं नियामकीय फायलिंगमध्ये सांगितलं. "महासाथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आलेल्या या संकटात ही भागीदारी अधिक लोकांपासून याची पोहोच निश्चित करेल आणि कोरोनाच्या विरोधातील लढाईत अॅक्सेसिबिलिटी निश्चित करेल," असं मत सिप्लाचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उमंग वोहरा यांनी व्यक्त केलं. 

DRDO चं अँटी कोविड औषध 2-DG कधी येणार बाजारात, किती असेल किंमत?; डॉ. रेड्डीजनं दिली माहिती

ICMR कडून होम टेस्टिंग कीटला मंजुरी

कोरोना चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या भल्यामोठ्या रांगा आणि त्याचे रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ हे त्रास आता वाचणार आहेत. तसेच रांगेत, गर्दीत गेल्याने कोरोना नसला तरी होण्याच्या भीतीने कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार कमी होणार आहेत. (India approved on Wednesday the first home test for Covid-19) कारण आता घरच्या घरी स्वत:च कोरोनाची चाचणी करता येणार आहे. ICMR कडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. घरच्या घरी रॅपिड अंटिजेन किट्स (Rapid Antigen Kits) द्वारे कोरोना चाचणी करण्यास इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) परवानगी दिली आहे. (ICMR issued detailed guidelines on who can use it and how.) केवळ कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्ती आणि कोरोना बाधिताच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती त्यांच्या घरीच रॅपिड अँटिजेन किट घेऊन कोरोना चाचणी करू शकणार आहेत.

Web Title: Cipla launches polymerase chain reaction test kit ViraGen for Covid 19 available from 25th may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.