शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: "आपण एक पाऊल टाका, सरकार चार पाऊल पुढे येईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:50 IST

मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले.यावेळी मोदींनी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासंदर्भात सरकारचा काय विचार करत आहे, यावर भाष्य केले.मोदी म्हणाले, मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात देशासमोर आर्थिक पातळीवर अनेक आव्हाने आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाला सुरुवात केली आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी, "सरकार आपल्या पाठीशी आहोत. आपण केवळ एक पाऊल पुढे या, सरकार चार पाऊल पुढे येईल," असा विश्वास त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. 

यावेळी मोदींनी, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासंदर्भात सरकारचा काय विचार करत आहे, यावर भाष्य केले. ते म्हणाले, देशाने आता लॉकडाउन मागे सोडला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी देशात एकही PPE किट तयार झालेली नव्हती. मात्र, आज दिवसाला तीन लाख किट तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सरकारचे लक्ष असेल. एवढेच नाही, तर भारतीय उद्योग संघाने (CII) प्रत्येक सेक्टरसंदर्भात एक रिसर्च तयार करून तो मला द्यावा, असेही मोदी म्हणाले.

CoronaVirus News: भारतात कोरोना टेकतोय गुडघे; ...तर लवकरच वाढणार ठणठणीत होणाऱ्यांचा आकडा!

व्यापाऱ्यांनी पुढे यावे, मी त्यांच्यासोबत -पंतप्रधान मोदींनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला, की ते त्यांच्यासोबत उभे आहेत. आपण एक पाऊल पुढे आलात, तर सरकार चार पाऊल पुढे येईल. आत्मनिर्भर भारताचा अर्थ रोजगार आणि विश्वास निर्माण करणे, असा आहे. जेनेकरून जागतीक सप्लायमध्ये भारताचा वाटा वाढेल. आता देशात, अशा उत्पादनांची आवश्यकता आहे, जे 'मेड इन इंडियासोबतच, मेड फॉर वर्ल्ड' असेल, असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम नॉर्मल झाले आहेत. मात्र हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आज आपल्याला कोरोना विषाणूशी लढायचं आहे. मात्र, त्याचसोबत अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचे आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेईल, असेही मोदी यावेळी म्हणाले.

George Floyd death: अमेरिकेत 52 वर्षांनंतर सर्वात मोठा हिसाचार; 40 शहरांमध्ये कर्फ्यू

मला देशाच्या क्षमतेवर, प्रतिभेवर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, म्हणूनच विश्वास आहे की, आम्ही पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला वेगवान गती देऊ. कोरोनाने भलेही अर्थव्यवस्थेचा वेग कमी केला असेल परंतु लॉकडाऊन मागे सोडून भारताने अनलॉक 1 च्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असेही ते म्हणाले.

धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतbusinessव्यवसायEconomyअर्थव्यवस्था