डाबर, पतंजलीसह अनेक ब्रँडच्या मधात भेसळ, CSE चा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 03:53 PM2020-12-03T15:53:10+5:302020-12-03T16:07:22+5:30

Chinese sugar found in Indian honey : देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे. 

‘Chinese sugar’ found in Indian honey, Dabur, Patanjali call CSE report ‘bid to malign’ brands | डाबर, पतंजलीसह अनेक ब्रँडच्या मधात भेसळ, CSE चा मोठा खुलासा

डाबर, पतंजलीसह अनेक ब्रँडच्या मधात भेसळ, CSE चा मोठा खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली - चवीला गोड असणारं मध आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आयुर्वेदामध्येही मधाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही मध गुणकारी ठरतं. अनेकजण वजन कमी करण्यासाठीही मधाचा वापर करतात. विविध गोष्टींवर गुणकारी ठरणारं मध शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करतं. मात्र आता मधाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आहे. 

सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याची माहिती या तपासातून मिळत आहे. सीएसईने 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाचे एकूण 22 सँपल्सपैकी फक्त पाच सँपल्स चाचणीत यशस्वी ठरले आहेत. 

सीएसईने केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचं मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरलं आहे. मात्र डाबर आणि पतंजलीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.

आमच्या कंपनीचं मध 100 टक्के शुद्ध - डाबर

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचं योग्यरित्या पालन करण्यात आल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. "आमच्या कंपनीचं मध 100 टक्के शुद्ध आहे. तसेच जर्मनीमध्ये झालेल्या एमएमआर चाचणीतही तो यशस्वी ठरला होता. आम्ही ठरवण्यात आलेले 22 मापदंड पूर्ण करतो. नुकताच जो अहवाल समोर आला तो प्रायोजित असल्याचं वाटत आहे" असं डाबरच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.

नैसर्गिकरित्या मध तयार करणाऱ्या कंपन्यांच्या बदनामीचा हा प्रयत्न - आचार्य बालकृष्ण

प्रतिक्रिया पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी "आम्ही 100 टक्के नैसर्गिक मध तयार करतो. प्रक्रिया केलेल्या मधाला अधिक प्रमोट केलं जावं यासाठी नैसर्गिकरित्या मध तयार करणाऱ्या कंपन्यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे" असं म्हटलं आहे. याआधी एफएसएसएआयने देशात आयात केला जाणारा मध गोल्डन सिरप, इनव्हर्ट शूगर सिरप आणि राईस सिरपची भेसळ करून विकला जात असल्याचं आयातदारांना आणि राज्यांच्या खाद्य आयुक्तांना सांगितलं होतं. दरम्यान सीएसईच्या टीमनं याची माहिती घेतली असता एफएसएसएआयनं ज्या गोष्टींची भेसळ होत असल्याची माहिती दिली होती ती उत्पादनं आयात केली जातच नसल्याचं समोर आलं. 

चीनमधील कंपन्या फ्रक्टोजच्या रुपात हे सिरप भारतात पाठवतात. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी "2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ ही मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी 10 एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या 10 पैकी 3 नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते" अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: ‘Chinese sugar’ found in Indian honey, Dabur, Patanjali call CSE report ‘bid to malign’ brands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.