शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

डोकलाममध्ये चिनी सैनिक पुन्हा दाखवू लागलेत खुन्नस, भारतीय जवानांची परिस्थितीवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 10:13 PM

डोकलाममध्ये निर्माण झालेला विवाद संपून काही दिवस उलटत नाहीत तोच चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना पुन्हा एकदा खुन्नस दाखवण्यास सुरुवात केली आहे. हवाईदलप्रमुख बी. एस. धनोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिक अजूनही चुंबी खोऱ्यात दबा धरून बसले आहेत.

नवी दिल्ली -  डोकलाममध्ये निर्माण झालेला विवाद संपून काही दिवस उलटत नाहीत तोच चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना पुन्हा एकदा खुन्नस दाखवण्यास सुरुवात केली आहे. हवाईदलप्रमुख बी. एस. धनोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिक अजूनही चुंबी खोऱ्यात दबा धरून बसले आहेत. मात्र सराव संपल्यानंतर ते माघारी फिरतील अशी अपेक्षा त्यांनी ल्यक्त केली आहे. चिनी सैनिक भारताला खुन्नस दाखवण्यासाठी तेथील रस्त्यावरून री-सरफेसिंग करत आहेत. चुंबी खोरे सिक्कीमच्या पूर्वेस आहे. याच परिसरातील डोकलाम येथे रस्ता बांधण्यावरून विवाद निर्माण झाला होता. येथील आपल्या कब्जातील परिसरात चीनने पुन्हा एकदा रिसरफेसिंग केले होते. ही जागा डोकलाममधील विवादापासून 12 किलोमीटर दूर आहे. जेथे दोन्ही देशांचे आमने-सामने आले होते.  डोकलाम येथे रस्ता बांधण्यावरून 16 जूनपासून भारत आणि चीनमधील डोकलाम विवादाला सुरुवात झाली होती. अखेर अनेक दाव्या प्रतिदाव्यांनंतर 73 दिवसांनी हा वाद ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस संपुष्टात आला होता. त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली होती. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली होती.चीनसोबत झालेल्या डोकलाम विवादानंतर भारताने चिनी सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा आणि विकासाची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक अभ्यासगट स्थापन करणार आहे. यामध्ये सीमेवरील जनतेला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यावर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे. सीमेवरील सुरक्षेची समीक्षा करण्यासाठी हा अभ्यासगट चिनी सीमेला लागून असलेल्या राज्यांची सरकारे आणि अन्य प्रतिनिधी मंडळांची चर्चा करेल आणि आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवेल

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय लष्कर