‘’लडाखमध्ये चीनने बळकावली भारताची पाच हजार चौकिमी जमीन?’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 10:07 PM2020-06-20T22:07:49+5:302020-06-20T22:15:48+5:30

लडाख प्रश्नावरून केंद्र सरकारला सतत टीकेचे लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने आता चीनच्या घुसखोरीवरून गंभीर शंका उपस्थित केली आहे.

"China seizes India's 5,000 square KM of land in Ladakh?" Serious allegations by Congress | ‘’लडाखमध्ये चीनने बळकावली भारताची पाच हजार चौकिमी जमीन?’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

‘’लडाखमध्ये चीनने बळकावली भारताची पाच हजार चौकिमी जमीन?’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

Next
ठळक मुद्देलडाखमध्ये चीनच्या घुसखोरीमुळे भारताने पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश गमावला आहे का? युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी मोदी सरकारवर टीका करताना केला हा गंभीर आरोप काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या हद्दीत कुणी घुसलेला नाही, तसेच घुसलेले नव्हते, असे सांगितले होते

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची घुसखोरी तसेच भारत आणि चीनच्या सैन्यात झालेली झटापट यामुळे देशात चिंतेचे वातावरण पसरलेले आहेत. त्यातच चीननेभारताच्या भूभागात घुसखोरी करून काही भागावर कब्जा केल्याचा दावा करण्यात येत असल्याने अनेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याचदरम्यान, लडाख प्रश्नावरून केंद्र सरकारला सतत टीकेचे लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने आता चीनच्या घुसखोरीवरून गंभीर शंका उपस्थित केली आहे. लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीमुळे भारताने पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश गमावला आहे का? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.  

युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी मोदी सरकारवर टीका करताना हा गंभीर आरोप केला आहे. आपण लडाखमध्ये पाच हजार चौरस किमी क्षेत्रफळाचा प्रदेश गमावला आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरवरून विचारला आहे. ११ मार्च रोजी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी लडाखमध्ये सुमारे ३८ हजार चौकिमी क्षेत्रावर चीनचा कब्जा आहे असे संसदेत सांगतले होते. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर पीएमओने स्पष्टीकरण देताना लडाखचा सुमारे ४३ हजार चौकिमी भाग चीनच्या ताब्यात असल्याचे सांगितले. याचा अर्थ आपण पाच हजार चौकिमीचे क्षेत्रफळ असलेला भूभाग गमावला असा घ्यायचा का? अशी विचारणा श्नीनिवास यांनी केली आहे.

काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या हद्दीत कुणी घुसलेला नाही, तसेच घुसलेले नव्हते, असे सांगितले होते. मात्र त्यावरून कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आक्रमक चीनसमोर झुकत मोदींनी भारताच्या भूभागावरील चीनचा दावा मान्य केला, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावरुन वाद होत असल्याने सरकारने याबाबत निवेदन काढत स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा दावा केला. पंतप्रधानांनी स्पष्टपणे हे सांगितले होते की, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल बदलण्यासाठी कोणत्याही प्रयत्नाला भारत सडेतोड उत्तर देईल. अशा कोणत्याही आव्हानांचा भारतीय सेना ठोस उत्तर देण्यास सक्षम आहे असं सांगितले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, यावेळी चीनचे सैनिक मोठ्या संख्येने एलएसीवर आले आहेत ही माहिती सर्वपक्षीय बैठकीत दिली. १५ जून रोजी गलवान येथे हिंसाचार झाला. कारण चीनी सैनिक एलएसीच्या जवळ हालचाली करत होते, त्याला रोखण्यासाठी गेलेल्या सैनिकांवर हल्ला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ जून रोजी गलवान येथे झालेल्या घटनेवर भाष्य केले आहे. ज्यात देशाचे २० सैनिक शहीद झालेत.

Web Title: "China seizes India's 5,000 square KM of land in Ladakh?" Serious allegations by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.