मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 11:25 IST2022-03-27T11:24:58+5:302022-03-27T11:25:35+5:30
शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

मुख्यमंत्री मान यांनी शेतकऱ्यांना दिली एक अब्जाची नुकसानभरपाई
बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना एक अब्ज रुपयांपेक्षा अधिक रकमेची भरपाई शनिवारी वाटप केली. पिकांच्या नुकसानीपोटी ही मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मान यांचा येथील धान्याच्या मंडईत हा पहिलाच कार्यक्रम होता.
शेतकऱ्यांच्या कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यापोटी १ अब्ज १ कोटी ३९ लाख ४५ हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. ही भरपाई केवळ मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांनाही यातून ७ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.