शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल बिनखात्याचे मुख्यमंत्री!

By admin | Updated: February 15, 2015 01:38 IST

विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी ‘इनिंग्ज’ही जगावेगळ््या पद्धतीने सुरू केली.

दिल्लीवर ‘आप’लं राज्य : जनसागराच्या साक्षीने शपथविधीनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी ‘इनिंग्ज’ही जगावेगळ््या पद्धतीने सुरू केली. स्वत:कडे एकही खाते न ठेवणारे केजरीवाल देशातील पहिले बिनखात्याचे मुख्यमंत्री झाले! ऐतिहासिक रामलीला मैदानावर हजारोंच्या साक्षीने झालेल्या दिमाखदार सोहळ््यात नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांच्या सप्तप्रधान मंडळास पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात मुख्यमंत्री केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याखेरीज असीम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंद्र जैन, गोपाल राय व जितेंद्र सिंग तोमर यांचा समावेश आहे. सिसोदिया यांनी सायंकाळी खातेवाटप जाहीर केले. त्यात केजरीवाल यांच्याकडे कोणतेही खाते नाही. सर्व मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवणे, सरकारचा कारभार तत्पर करणे आणि जनतेशी संपर्कात राहणे ही तीन कामे मुख्यमंत्री केजरीवाल करतील.क्रोसिन घेऊन आले... केजरीवाल यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताप आहे. शपथ घेण्यासाठी रामलीला मैदनावर जातानाही ते क्रोसिनची गोळी घेऊन गेले होते. त्यांनी स्वत: भाषणात हे सांगितले.पदभार स्वीकारला : नवनियुक्त मुख्यमंत्री केजरीवाल व त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य शपथविधी समारंभानंतर थेट सचिवालयात पोहोचले आणि आपापल्या पदाची सूत्रे स्वीकारली. येथे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली. या चर्चेत भविष्यातील डावपेचांबाबत विचारविनिमय झाल्याचे समजते.देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली. जनसेवेसाठी २४ तास काम, व्हीआयपी संस्कृती संपविणे अणि दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मानसही त्यांनी या वेळी व्यक्त केला. शपथविधीस उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमाची एक यादीच सादर केली.