शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महागाईवरून जेटलींना चिदंबरम यांचे प्रत्युत्तर

By admin | Updated: July 30, 2016 05:16 IST

संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही

नवी दिल्ली : संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे सोडली होती, ही अर्थमंत्री अरुण जेटली यांची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी फेटाळली आहे. या टीकेत कोणतेही तथ्य नाही, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी टिष्ट्वट करून जेटली यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. चिदंबरम म्हणाले की, ‘संपुआने दोन अंकी महागाई मागे सोडली होती, असे अर्थमंत्री म्हणतात. जून २0१४ मध्ये सीपीआय (ग्राहक वस्तू निर्देशांक) ६.७७ टक्क्यांवर तर डब्ल्यूपीआय (ठोक किंमत निर्देशांक) ५.६६ टक्क्यांवर होता. अर्थमंत्र्यांनी दोन आकडे स्वत:चे टाकले आहेत का? जंतर-मंतर आकडेवारी!’काल लोकसभेत महागाईवरील चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी सांगितले होते की, २0१४ मध्ये संपुआ सरकारने आमच्यासाठी दोन अंकी महागाई मागे ठेवली होती. ती आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. चांगल्या मान्सूनमुळे ती आणखी कमी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महागाईचा मुद्दा गाजलाराहुल गांधी यांनी मोदी महागाई कमी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ‘हरहर मोदी’ऐवजी लोक आता ‘अरहर मोदी’ अशी नवी घोषणा देऊ लागले आहेत.’ उत्तर भारतात तूर डाळीला अरहर म्हटले जाते. तूर डाळीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी वरील विधान केले होते.