Cough Syrup : "ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:07 IST2025-10-08T14:05:47+5:302025-10-08T14:07:18+5:30
Cough Syrup : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे उसैदचा मृत्यू झाला.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे उसैदचा मृत्यू झाला. १० ऑक्टोबर रोजी त्याचा वाढदिवस होता. पण त्याच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. उसैदची आई अफसानाने आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझ्या मुलाला कोणताही गंभीर आजार नव्हता, फक्त ताप आला होता. म्हणून मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी कोल्ड्रिफ कफ सिरप लिहून दिलं."
"मी ते त्याला तीन-चार दिवसांसाठी दिले. ताप कमी झाला, पण त्याचे हातपाय सुजले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत त्याला छिंदवाडा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितलं. आम्ही त्याला नागपूरला घेऊन गेलो. नागपुरात टेस्ट करण्यात आल्या. त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं उघड झालं. माझ्या मुलाला यापूर्वी कधीही असा आजार झाला नव्हता. तो खूप निरोगी मुलगा होता."
पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
"ते औषध नव्हतं, विष होतं"
"फक्त माझा मुलगाच नाही, तर या सिरपमुळे १४-१६ मुलांचा मृत्यू झाला आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे. ते औषध नव्हतं, ते विष होतं, जे मी स्वतः माझ्या मुलाला दिलं. ते विष होतं. मी ते माझ्या मुलाला दररोज देत होते आणि मला ते विष आहे याची कल्पनाही नव्हती. जर मला माहित असतं तर मी कदाचित ते दिलं नसतं. औषधाच्या नावाखाली विष दिलं जात आहे हे कोणालाही माहित नव्हतं."
"पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
"औषध कंपनी सर्वात मोठी गुन्हेगार"
"सर्वजण दोषी आहेत. औषध कंपनी सर्वात मोठी गुन्हेगार आहे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही आमच्या निष्पाप मुलाला खूप काळजी घेऊन वाढवलं आणि हे घडलं. मोठा निष्काळजीपणा आहे. आमचा मुलगा गेला आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करण्यासाठी खूप प्रयत्न केले, आम्ही इकडे तिकडे धावलो, पण तरीही आमचा मुलगा वाचला नाही. ही संपूर्ण यंत्रणेची चूक आहे" असं उसैदची आई अफसानाने म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.