'राधे-राधे' म्हटले म्हणून नर्सरीच्या मुलीला बेदम मारहाण, तोंडाला चिकटटेप लावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 23:35 IST2025-07-31T23:32:16+5:302025-07-31T23:35:26+5:30
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे

'राधे-राधे' म्हटले म्हणून नर्सरीच्या मुलीला बेदम मारहाण, तोंडाला चिकटटेप लावली!
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने नर्सरीच्या वर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलीने राधे-राधे म्हटले म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. शिवाय, तिच्या तोंडाला चिकटटेप लावण्यात आली. याप्रकरणी तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपी महिला मुख्याध्यापिका एला इव्हान कोल्विनला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नंदिनी नगर पोलिस स्टेशन परिसरातील बागडुमार भागात असलेल्या 'मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये ही घटना घडली. त्यानंतर मुलीचे वडील प्रवीण यादव यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली.
मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, बुधवारी त्यांची मुलगी शाळेतून परतल्यावर तिने सांगितले की, मुख्याध्यापिका एला इव्हान कोल्विन यांनी 'राधे-राधे' म्हणण्याबद्दल तिला मारहाण केली आणि तिच्या तोंडावर टेपही लावली. तक्रारीवरून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायदा २०१५ च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि मुख्याध्यापकांना अटकही केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे, अशी माहिती नंदणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पारस सिंह ठाकूर यांनी दिली.