शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 5:02 AM

विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे.

- योगेश पांडे विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. विधानसभेत तब्बल ७५ टक्के जागांवर विजय मिळविणाऱ्या काँग्रेसचा विजयरथ भाजपाने थांबविला आहे. काँग्रेसचे उमेदवार अवघ्या दोन जागांवर आघाडीवर होते.विधानसभेतील चुकांपासून धडा घेत भाजपाने यंदा सर्वच उमेदवार बदलत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विधानसभेत ९० पैकी १५ जागांवर विजय मिळविणाºया भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष विक्रम उसेंडी यांच्या नेतृत्वात लोकसभेत दणदणीत यश मिळाले आहे. अरुण साव (बिलासपूर), गुहाराम आजगले (जांजगिर),गोमती साई (रायगड), सुनील सोनी (रायपूर), संतोष पांडे (राजनांदगाव), रेणुका सिंग (सरगुजा) या भाजपच्या सहा उमेदवारांनी तर लाखाहून अधिक मताधिक्य मिळविले. तर इतरांनीदेखील सन्मानजनक मतं मिळविली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसला दारुण अपयशाचा सामना करावा लागला आहे. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसची एक जागा वाढली असली तरी ही पक्षाची नामुष्कीच मानली जात आहे. छत्तीसगडमध्ये पाच महिन्यांतच जनतेने सत्ताधारी काँग्रेसला नाकारले आहे. भाजपाने नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळात जाऊन मतदारांशी संपर्क केला. प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक मुद्यांंना प्रचारात स्थान देण्यावर भर दिला.निकालाची कारणेविधानसभेतील पराभवानंतर प्रदेश नेतृत्वात बदल करण्यात आला. तसेच संघटन मजबुतीवर विशेष भर देण्यात आला.जनतेमधील नाराजी लक्षात घेऊन सर्व खासदारांचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व माजी मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह यांच्या प्रचाराची ‘जादू’ चालली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस