JCB Tyre Bursts : हवा भरताना JCB चं टायर फुटलं, दोघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:03 PM2022-05-05T13:03:35+5:302022-05-05T13:46:30+5:30

हा स्फोट एवढा भीषण होता, की टायरजवळ उभे असलेले दोन्ही तरुण हवेत फेकले गेले.

chhattisgarh jcb tyre bursts while air being filled in raipur cctv footage video viral  | JCB Tyre Bursts : हवा भरताना JCB चं टायर फुटलं, दोघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

JCB Tyre Bursts : हवा भरताना JCB चं टायर फुटलं, दोघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद

Next

छत्तीसगडच्या रायपूरमधील सिलतारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे हवा भरतानाच जेसीबीचा टायर फुटला. या घटनेत तेथे उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राजपाल आणि प्रांजन, अशी या मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

घटना कॅमेऱ्यात कैद -
हा स्फोट एवढा भीषण होता, की टायरजवळ उभे असलेले दोन्ही तरुण हवेत फेकले गेले. एवढेच नाही, तर त्यांच्या शरीराचेही काही तुकडे आजूबाजूला पडले होते. तसेच, जेसीबीचे टायरही हवेत उडून दूरवर जावून पडले होते. याप्रकरणी सिलतारा चौकीचे प्रभारी राजेश जान पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल सिंग (३२) आणि प्रंजन नामदेव (३२) हे दोघेही सिलतरा भागात घनकून स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये काम करत होते. 

हे दोघेही दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायरचा मोठा आवाज झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 




या अपघातानंतर, दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यावर, पोलिसांनी ते कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

Web Title: chhattisgarh jcb tyre bursts while air being filled in raipur cctv footage video viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.