छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 08:57 PM2021-03-05T20:57:35+5:302021-03-05T20:57:53+5:30

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथील कोहकमेटा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Chhattisgarh ITBP jawan dies due to ied blast in narayanpur)

Chhattisgarh ITBP jawan dies due to ied blast in narayanpur | छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील जवान शहीद

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात IED स्फोट, महाराष्ट्रातील जवान शहीद

googlenewsNext
ठळक मुद्देछत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आयईडी स्फोट नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या आयईडीमध्ये झालेल्या स्फोटात हेड कॉन्स्टेबल रामतेर मंगेश आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश हे महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी होते.

रायपूर - छत्तीसगडमधील नारायणपूर (Narayanpur) जिल्ह्यात आयईडी स्फोट झाला असून यात एका आयटीबीपी जवानाचा मृत्यू झाला. रामतेर मंगेश, असे या जवानाचे नाव असून ते मुळचे महाराष्ट्रातील नागपूर येथील होते. नारायणपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे नक्षलवाद्यांनी (naxalite) आयईडी (IED) पसरवले होते. (Chhattisgarh ITBP jawan dies due to ied blast in narayanpur)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या या स्फोटात आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथील कोहकमेटा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पसरवले होते, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना

अधिकाऱ्यांनी सांगितले, की नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या आयईडीमध्ये झालेल्या स्फोटात हेड कॉन्स्टेबल रामतेर मंगेश आले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश हे महाराष्ट्रातील नागपूर येथील रहिवासी होते. घटनेच्या वेळी भारत-तिबेट सीमा पोलिसांचा (आईटीबीपी) चमू एका मिशनवर होता.

आदिवासी बनले पोलिसांसाठी ‘लायजनिंग पर्सन’ होतेय मदत

पोलिसांनी उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना -
गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबुझमाडच्या जंगलात दोन्ही राज्याच्या पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धुमश्चक्रीत आज नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले.  गेल्या 48 तासापासून त्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये 3 वेळा चकमकी उडाल्या. यादरम्यान एक पोलीस जवान जखमी झाला आहे, पण त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे, पण पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. 
 

Web Title: Chhattisgarh ITBP jawan dies due to ied blast in narayanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.