छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. डीजेच्या तालावर नाचत-गाजत नवरदेवाच्या घराकडे निघालेल्या वऱ्हाड्यांना एका सुसाट ट्रकने चिरडलं. शिवरीनारायणच्या दिशेने येणाऱ्या या अनियंत्रित ट्रकने दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एका पुरुषाचा मणका मोडला असून, दोन महिलांच्या पायाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर किंकाळ्यांमध्ये झाले. सोशल मीडियावर समोर आलेला या घटनेचा व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वरात उत्साहात पुढे सरकत आहे, महिला आणि पुरुष आनंदाने नाचत आहेत. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्याच क्षणी काळ समोर येईल. तितक्यात एका भरधाव ट्रकने गर्दीत शिरून लोकांना उडवलं.
या भीषण धडकेत अनेक जण जमिनीवर कोसळले. ट्रक वरातीत कसा शिरला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ट्रकचे ब्रेक फेल झाले होते की चालक नशेत होता, याचा तपास पोलीस करत आहेत. बिर्रा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Summary : A speeding truck struck a wedding procession in Chhattisgarh, injuring several. One man suffered a spinal fracture, and two women sustained serious leg and chest injuries. Police are investigating the cause, suspecting brake failure or driver intoxication. The joyous celebration turned into chaos.
Web Summary : छत्तीसगढ़ में एक तेज़ रफ्तार ट्रक ने बारात को टक्कर मार दी, जिसमें कई लोग घायल हो गए। एक व्यक्ति की रीढ़ की हड्डी टूट गई, और दो महिलाओं को गंभीर पैर और छाती में चोटें आईं। पुलिस ब्रेक विफलता या नशे में चालक होने का संदेह करते हुए जांच कर रही है। खुशी का माहौल मातम में बदल गया।