छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:45 IST2025-07-12T15:34:20+5:302025-07-12T15:45:03+5:30

छांगुरचे स्विस बँकेतही खाते आहे. या खात्यातून परदेशी निधीही दिला जात होता. परदेशातून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून तो विशेषतः उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमावर्ती भागात धर्मांतराचे नेटवर्क चालवत होता.

Chhangur Baba's cleverness, he invested a lot of money in property but he doesn't have a single land in his name | छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही

छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही

उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्या छांगुर बाबाच्या आलिशान कोठीवर मागील ३ दिवसांपासून बुलडोझर कारवाई सुरू आहे. याबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. बाबा हा अशिक्षित असू शकतो पण तो धूर्त आहे. त्याने बेकायदेशीर धर्मांतराचे काम पुढे नेण्यासाठी अनेक युक्त्या केल्या होत्या. तो लोकांना मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवत होता. तो त्यांच्याकडून मालमत्तेचे काम करून घ्यायचा आणि त्यातून मिळणारा नफा धर्मांतराच्या कामात वापरायचा, पण हे सर्व असूनही, बाबाकडे स्वत:च्या नावावर कोणतीही जमीन नसल्याचे समोर आले. 

छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस

बलरामपूरच्या उत्तरौला नगरमध्ये त्याने जी काही जमीन खरेदी केली होती ती त्याने स्वतःच्या नावावर नाही तर नीतू उर्फ नसरीनच्या नावावर नोंदणीकृत केली. महसूल विभागाच्या पथकाने नीतू उर्फ नसरीनच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींची माहिती गोळा केली आहे.  

माधपूर व्यतिरिक्त, छांगूरने मोहल्ला रफीनगरमध्ये नीतूच्या नावाने खात्यात जमीन खरेदी केली. त्या जमीनिवर दुकान बांधले. या जमिनीची अद्याप नोंदणी झालेली नाही. दुकानात कपडे विकले जात होते परंतु बाबा तुरुंगात गेल्यापासून दुकान बंद आहे. त्याचप्रमाणे लालगंजमध्ये नीतू उर्फ नसरीनच्या नावाने जमीन खरेदी करून दुकान बांधले. येथेही दुकानात कपडे विकले जात आहेत. बाबा तुरुंगात जाताच दुकान बंद केले आहेत. महाराष्ट्रातील पुण्यात नीतू उर्फ नसरीनच्या नावाने जमिनीचा करारही करण्यात आला आहे. डीएम पवन अग्रवाल म्हणाले की, चौकशीनंतर ज्या ज्या मालमत्ता बेकायदेशीर असल्याचे आढळतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल.

स्विस बँकेत खाते, पाकिस्तान-दुबई-तुर्कीमधून निधी

छांगूरचे स्विस बँकेतही खाते आहे, या खात्यामध्ये त्याचे पैसे जमा असल्याचे सांगितले जाते. या खात्यात परदेशी निधी देखील जमा केला जात होता. परदेशातून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांमधून तो विशेषतः उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमावर्ती भागात धर्मांतराचे नेटवर्क चालवत होता. छांगूरच्या परदेशी निधीचे नेटवर्क चालवणाऱ्या त्याच्या एका साथीदाराने स्वित्झर्लंडसह इतर अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे.

Web Title: Chhangur Baba's cleverness, he invested a lot of money in property but he doesn't have a single land in his name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.