शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 18:00 IST

मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.

नवी दिल्ली - मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने गुरुवारी स्पेशल कोर्टामध्ये नाईकविरोधातील आरोपपत्र सादर केले आहे. 65 पानांच्या या आरोपपत्रात नाईकवर प्रक्षोभक भाषणे आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपपत्रासोबत 1000 पानांचा दस्तऐवज जमा कऱण्यात आला आहे. ज्यामध्ये 80 हून अधिक साक्षीदारांचे जबाव नोंदवलेले आहेत.  परदेशात पळालेल्या झाकीर नाईक विरोधात  यूएपीए आण भादंविच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.  दरम्यान,  मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात    लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एनआयएने काही दिसांपूर्वीच दिली होती. आता याबाबतची औपचारिकता पूर्ण करून आज हे आरोपपत्र विशेष न्यायालयासमोर सादर केले होते. झाकीर नाईकच्या संस्था आणि त्याच्या संशयास्पद व्यवहारांचा एनआयकडून तपास सुरू आहे. गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईककडून प्रेरणा घेतल्याचे कबूल केल्यानंतर झाकीरने भारतातून पळ काढला होता. दरम्यान, गतवर्षी 18 नोव्हेंबर रोजी एनआयएने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान,  काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने पोलिसांच्या चौकशीमध्ये दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे खास संबंध असल्याचा खुलासा केला होता. वर्ष 2012 पासून दाऊद इब्राहिम झाकीर नाईकला पैसे पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा इकबाल कासकरने केला.   मुंबईतले काही उद्योगपती दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून झाकीर नाईकची मदत करतात आणि त्याला पैशांचा पुरवठा करतात असा खुलासा इक्बालने केला होता. झाकीर नाईकच्या एनजीओद्वारे हवाला नेटवर्कलाही पैसा पुरवला जातो असं कासकर म्हणाला. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे आणि त्याला पाकिस्तानात सुरक्षाही पुरवली जाते असा खुलासा यापूर्वी कासकरने केला होता.  

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा