Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 07:25 AM2019-12-03T07:25:10+5:302019-12-03T07:33:49+5:30

एक किलोमीटर अंतरावरुन काढलेला फोटो नासाकडून प्रसिद्ध

Chandrayaan 2 NASA finds Vikram Lander releases photo of impact site on moon surface | Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध

Chandrayaan 2: विक्रम लँडरचे तुकडे सापडले; नासाकडून फोटो प्रसिद्ध

googlenewsNext

नवी दिल्ली: अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचे फोटो टिपला आहे. हा फोटो नासाकडून ट्विट करण्यात आला आहे. ७ सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोनं अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात इस्रोला अपयश आलं. 

नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होतं, त्यापासून 750 मीटर अंतरावर नासाला त्याचे तुकडे सापडले आहेत. विक्रमचे तीन मोठे तुकडे 2x2 पिक्सलचे आहेत. नासानं रात्री दीडच्या सुमारास विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला. लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरला विक्रमचे तीन तुकडे दिसल्याची माहिती नासानं ट्विटमधून दिली. 



नासानं एक किलोमीटर अंतरावरुन विक्रम लँडरचे फोटो टिपले आहेत. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या क्रॅश लँडिंगमुळे झालेला परिणाम दिसून येत आहे. विक्रमला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आलं नाही. विक्रमचं लँडिंग चुकल्यानं त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर झालेले परिणाम नासानं टिपलेल्या फोटोत स्पष्टपणे दिसत आहेत. इस्रोनं नासाशी संपर्क साधून विक्रम लँडरसंदर्भातील विस्तृत माहिती मागितली आहे. नासा विक्रम लँडरबद्दलचा एक अहवाल इस्रोला देणार आहे. यामधून विक्रमच्या क्रॅश लँडिंगबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल. 

विक्रम लँडरच्या संदर्भातील माहिती मिळण्याची शक्यता नासानं याआधीच व्यक्त केली होती. विक्रमचं क्रॅश लँडिंग झालेल्या भागावरुन लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटर जाणार असल्यानं विक्रम लँडरशी संबंधित माहिती हाती लागू शकते, अशी शक्यता नासाकडून वर्तवण्यात आली होती. याआधी १७ सप्टेंबरला नासाचं ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेलं होतं. मात्र त्यावेळी विक्रमशी संबंधित माहिती नासाला मिळाली नव्हती. 

Web Title: Chandrayaan 2 NASA finds Vikram Lander releases photo of impact site on moon surface

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.