शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 3:45 AM

तांत्रिक बिघाड दूर; रंगीत तालमीनंतर काऊंट डाऊन सुरू

निनाद देशमुख श्रीहरीकोटा : भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम सोमवारी दुपारी होणाºया प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी जाहीर केले. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाºया ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.

इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले की, आधी १५ जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार आहे.

सिवान म्हणाले की, शनिवारी सायंकाळी प्रक्षेपक रॉकेटची व इतर अनुषंगिक यंत्रणांची पुन्हा एकदा पूर्णांशाने रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात कोणतीही अडचण किंवा दोष न आढळल्याने प्रक्षेपणासाठी उलटी गणती सुरू झाली आहे. आधी तीन वेळा पुढे ढकललेले प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे व्हायचे होते. त्यासाठी श्रीहरिकोट्याच्या अंतराळ तळापाशी उभारलेल्या दर्शक दीर्घेमध्ये जगभरातील पत्रकारांसह अनेक मान्यवरही जमले होते, परंतु उड्डाणाला अवघी ५६ मिनिटे शिल्कक असताना प्रक्षेपक रॉकेटमध्ये काही बिघाडाचा संशय आल्याने सावधगिरी म्हणून प्रक्षेपण थांबविण्यात आले होते.

त्यावेळी नेमके काय झाले होते हे ‘इस्रो’ने अधिकृतपणे उघड केलेले नाही. मात्र विश्वसनीय सूत्रांनुसार रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या द्रवरूप इंधनाच्या टाकीमधील हवेचा दाब इंधन भरल्यानंतर कमी होत असल्याचे जाणवले होते. त्यामुळे टाकीच्या व्हाल्व्हमधून तर गळती होत नसावी ना, अशी शंका आली होती. परंतु तंत्रज्ञांच्या तज्ज्ञ समितीने आता याचे पूर्णपणे समाधानकारक निरसन केले आहे. चंद्रावर उतरल्यावर लँडरमध्ये ठेवलेली ‘रोव्हर’ ही छोटेखानी चारचाकी गाडी उतरत्या फलाटावरून बाहेर पडेल. त्यावेशी चंद्रावर नुकताच दिवस उगवलेला असेल. तो संपूर्ण चांद्रदिन (पृथ्वीवरील १४ दिवस) हे ‘रोव्हर’ अत्यंत धीम्यागतीने चंद्राच्या पृष्ठभागावर ५०० मीटरपर्यंतचा फेरफटका मारेल. यात ते चंद्राच्या मातीचे विश्लेषण करण्याखेरीज इतरही अनेक वैज्ञानिक प्रयोग करेल.‘आॅर्बिटर’ त्यानंतर पुढील एक वर्षे चंद्राच्या प्रदक्षिणा करून त्याचे सविस्तर नकाशे तयार करेल. चंद्रावर अलगद उतरणे हाच ‘चाद्रयान-१’ व ‘चांद्रयान-२’ मधील मुख्य फरक आहे. ‘चांद्रयान-१’ मोहिमेत वरून टाकल्याने चंद्रावर आदळत उतरले होते. ‘चांद्रयान-१’ने चंद्रावर गोठलेले पाणी असल्याचा शोध लावला होता. आता ‘चांद्रयान-२’चे लँडर जेथे उतरणार आहे त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप खोल विवरे असून तेथे साठलेला बर्फ असण्याची शक्यता आहे.अलगद उतरण्याचे असेल आव्हानप्रक्षेपक रॉकेट स्वत:सह एकूण 3.8टन वजनासह उड्डाण करेल. त्यात ‘ऑर्बिटर’, ‘विक्रम’ हा लँडर व ‘प्रज्ञान’ हे रोव्हर असे तीन प्रमुख भाग असतील.57दिवस योग्य कक्षा व उंची गाठण्यासाठी पृथ्वीभोवती घिरट्या घातल्यानंतर हे रॉकेट चंद्राच्या कक्षेत पोहोचेल.6-7 सप्टेंबर रोजी रॉकेटमधून एकत्र बांधणी केलेले लँडर व रोव्हर बाहेर पडेल. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ एका पूर्वनिर्धारित स्थळी अलगद उतरविले जाईल.चंद्राच्या पृष्ठभागावर असे अलगद उतरणे हेच मोठे जिकिरीचे आव्हान आहे. ते फत्ते झाले, तर अशी क्षमता असलेला भारत हा अमेरिका, रशिया व चीननंतरचा चौथा देश ठरेल.

 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो