चंद्रभागा भागविणार लातूरची तहान

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:37+5:302015-08-26T23:32:37+5:30

पंढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तयार केला असून, त्याबाबत रेल्वे विभागाला पत्रही दिले आहे.

Chandrabhaga will sacrifice Latur's thirst | चंद्रभागा भागविणार लातूरची तहान

चंद्रभागा भागविणार लातूरची तहान

ढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तयार केला असून, त्याबाबत रेल्वे विभागाला पत्रही दिले आहे.
लातूर शहराची लोकसंख्या सुमारे चार लाख असून दररोज चाळीस एम.एल.डी पाणी लागते. इतका पाणीपुरवठा करणारे पाण्याचे सर्व स्रोत आता ठप्प होत असल्याने आता रेल्वेने पाणी नेण्याची योजना केली आहे.
मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीचा सामना करण्यासाठी लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्?ातील पाण्याची व चार्‍याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 550 कोटी रुपयांचा निधी दिला त्यातून लातूर, बीड, उस्मानाबादला रेल्वेने पाणी आणण्याची योजना आखली गेली आहे.
रेल्वेने पाणी नेण्याची योजना अंमलात आणली तर उजनीतून भीमेत पुन्हा विसर्ग करावा लागणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाशी जिल्हाधिकार्‍यांनी पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------------
रेल्वेने असे येईल पाणी
--
पंढरपूर ते लातूरसाठी स्वतंत्र पाण्याच्या व्ॉगन (टँकर) रेल्वे सोडावी लागणार आहे. एका व्ॉगनमध्ये 51 हजार लिटर पाणी बसते. त्यामुळे सुमारे 50 व्ॉगनची रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे एका खेपेत 25 लाख लिटर पाणी नेता येणार आहे.
---
अडचणी या आहेत
---
पंढरपूर ते लातूर लोहमार्गाचे अंतर 207 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे पंढरपूरवरून निघालेल्या रेल्वेला लातूरपर्यंत पोहोचण्यासाठी आठ तास लागतात. हा लोहमार्ग एकेरी असल्याने पाणी घेऊन जाणार्‍या रेल्वेसाठी जाताना आठ तास व येताना आठ तासासाठी असे नवे नियोजन करावे लागणार आहे त्यामुळे नियमित धावणार्‍या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकामध्ये व्यत्यय येतो त्यामुळे वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे.
---
कोट 1
पंढरपूर ते लातूरच्या पन्नास व्ॉगनच्या रेल्वेसाठी साधारण 52 हजार रुपये भाडे आकारले जाते. त्याची पूर्तता झाल्यावर पाणी देणे शक्य होणार आहे.
भास्कर राव
असिस्टंट कर्मशियल मॅनेजर, सोलापूर.
----------------
कोट -2
पंढरपूर ते लातूरला रेल्वेने पाणी नेण्यासाठी अद्याप पंढरपूर रेल्वे कार्यालयाला अधिकृत पत्र आले नाही. त्यामुळे सध्यातरी कोणतेच बदल नाहीत.
राजेश वर्मा
सहायक मंडल इंजिनिअर,पंढरपूर.
-----पूर्ण--

Web Title: Chandrabhaga will sacrifice Latur's thirst