शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठि काणी तरुणावर चाकूहल्ला

By admin | Updated: January 8, 2016 02:14 IST

औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

औरंगाबाद : मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर ओळखीच्याच दोन जणांनी भांडण उकरून काढून चाकूहल्ला केला. ही घटना रोशनगेट परिसरातील मदनी चौक येथे ५जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
शेख इस्माईल शेख इब्राहिम (३२,रा.बाबर कॉलनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की. शेख इस्माईल हे ५ जानेवारी रोजी मदनी चौक येथे मित्रासोबत गप्पा मारत होते. याप्रसंगी त्यांच्या ओळखीतील आरोपी बखर आणि अन्य एक जण तेथे आला. यावेळी त्यांनी तू येथे काय करतो, असे विचारत शिवीगाळ करीत भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी बखरने धारदार चाकूने इस्माईलवर चाकूने हल्ला केला. या घटनेत इस्माईल जबर जखमी झाला. याप्रकरणी आरोपीविरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अन्य एका घटनेत मोगलपुरा येथील १६ वर्षीय युवकावर दोन जणांनी पतंग उडविण्याच्या कारणावरून चाकूहल्ला केला. ही घटना ५ जानेेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर घडली. किरण आणि मायकल (पूर्ण नाव आणि पत्ता नाही)असे आरोपींची नावे आहेत. तरुण हा पतंग उडवीत असताना आरोपींनी त्यास ढकलून दिले. याप्रसंगी त्यांच्यात जोरदार वाद झाला. वादानंतर आरोपींनी तरुणावर चाकूने वार केले. छावणी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


अश्लील मेसेज पाठवून विनयभंग
औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील रहिवासी महिलेच्या मोबाईलवर आठ दिवस अश्लील मेसेज पाठवून आणि फोन करून तिला त्रास दिल्याप्रकरणी एका ट्रॅव्हल्सच्या चालकाविरोधात क्र्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा एका ट्रॅव्हल्स कंपनीत चालक पदावर कार्यरत आहे. गारखेडा परिसरातील पुंडलिकनगर येथील महिलेचा क्रमांक मिळवून २८ डिसेंबरपासून ते ५ जानेवारीपर्यंत तो तिला त्रास देत होता. सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ या घटनेचा तपास करीत आहेत.