शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीपासून कोरोनाची साथ उतरणीला लागणार, लस विकसित झाल्यास मिळेल दिलासा; केंद्राच्या समितीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:02 IST

हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. या समितीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास तोवर रुग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते. (CoronaVirus)

ठळक मुद्देहैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत.फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास तोवर रुग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते. नियमांचे नीट पालन न केल्यास सणासुदीच्या दिवसांत रुग्ण संख्या आणखी २६ लाखांनी वाढण्याचा धोका आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना साथीने आता कळस गाठला असून ती पुढील वर्षी फेब्रुवारीपासून उतरणीला लागण्याची शक्यता आहे, असे केंद्राने या साथीसंदर्भात नेमलेल्या शास्त्रज्ञांच्या समितीने म्हटले आहे. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे. 

हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक एम. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. या समितीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास तोवर रुग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते. नियमांचे नीट पालन न केल्यास सणासुदीच्या दिवसांत रुग्ण संख्या आणखी २६ लाखांनी वाढण्याचा धोका आहे, असे समितीने म्हटले आहे. सध्या नवरात्र सुरू होऊन, त्यानंतर दसरा, दिवाळी, क्रिसमस हे उत्सव आहेत. या काळात सर्वांनी फिजिकल डिस्टन्स पाळत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावाच लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. हिवाळ्यात दुसऱ्या लाटेची शक्यता -देशात मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर केला नसता, तर या आजाराने आतापर्यंत २५ लाख बळी घेतले असते, असे समितीने म्हटले आहे.  हिवाळ्यामध्ये कोरोना साथीची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व कोरोना साथीसंदभार्तील शास्त्रज्ञांच्या समितीचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनीही नमूद केले. त्वचेवर विषाणू राहतो नऊ तास  -कोरोनाचा विषाणू मानवी त्वचेवर सुमारे नऊ तास जिवंत राहतो, असा निष्कर्ष जपानी शास्त्रज्ञांनी प्रयोगाअंती काढला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सतत हात धुवायला हवेत, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या संशोधनावरील एक लेख क्लिनिकल इन्फेक्शिअस डिसिजेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरIndiaभारत