Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 22:32 IST2026-01-02T22:30:14+5:302026-01-02T22:32:31+5:30
Centre Government on X: केंद्र सरकारने एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एका औपचारिक नोटीसद्वारे कडक तंबी दिली.

Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
केंद्र सरकारने एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला एका औपचारिक नोटीसद्वारे कडक तंबी दिली. एक्सच्या ग्रोक या एआय टूलचा गैरवापर करून महिला आणि मुलांना लक्ष्य करणारी अश्लील आणि आक्षेपार्ह कटेंट तयार केली जात असल्याबद्दल सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली असून, ७२ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, एक्स प्लॅटफॉर्म माहिती तंत्रज्ञान कायदा (आयटी कायदा, २०००) आणि आयटी नियमांनुसार आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. विशेषतः ग्रोक एआयद्वारे तयार होणारा अश्लील कंटेंट गोपनीयतेच्या आणि डिजिटल सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सरकारने नमूद केले आहे.
The Ministry of Electronics and Information Technology (MeitY) has issued a formal notice to X, flagging serious lapses in statutory due diligence under the IT Act and IT Rules. The government has raised concerns over the misuse of the platform’s AI tool, Grok, to generate and… pic.twitter.com/RmckirR8Ba
— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2026
केंद्र सरकारने एक्सला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सर्व बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह कंटेंट ताबडतोब काढून टाकण्याचे आणि या प्रक्रियेत सामील असलेल्या दोषी वापरकर्त्यांवर कठोर कारवाई करून ७२ तासांच्या आत 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' मंत्रालयाला सादर करावा, असेही आदेश दिले.
मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर 'एक्स'ने या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण गमवावे लागेल. अशा परिस्थितीत, प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी कंपनीचे अधिकारी थेट फौजदारी कारवाईसाठी पात्र ठरतील.