शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट, DA मध्ये ४ टक्क्यांच्या वाढीला मंजुरी; किती वाढणार पगार वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 9:58 PM

सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे.

नवी दिल्ली-

सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. आता दोन्ही ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. सध्याची वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. यामुळे सरकारवर दरवर्षी १२,८१५ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा वाढणार आहे. दुसरीकडे, सरकारने उज्ज्वला सिलिंडरवरील अनुदान आणखी एक वर्षासाठी वाढवलं ​​आहे. देशातील ९.६० कोटी लाभार्थ्यांना एका वर्षासाठी २०० रुपये प्रति सिलिंडरचा लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा केली जाते. सरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्ता दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता दिला जातो. सध्याची वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. यापूर्वी एक कोटीहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळत होता. जो वाढून ४२ टक्के इतका झाला आहे. सरकारने जुलै २०२१ मध्ये पुन्हा डीए वाढवण्याची घोषणा केली होती.

डीएची थकबाकी मिळेल का?केंद्राने १८ महिन्यांच्या डीए थकबाकीवर स्पष्टीकरण जारी केलं होतं. कर्मचार्‍यांची १८ महिन्यांची महागाई भत्ता (DA) थकबाकी दिली जाणार नाही असं सांगण्यात आलं होतं. कोविड महामारीच्या काळात ते थांबवण्यात आले होते. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने २०२० मध्ये महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) चे तीन हप्ते थांबवले होते. या वेळेपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक प्रलंबित थकबाकीबाबत अपडेटची प्रतीक्षा करत आहेत. या निर्बंधामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ३४ हजार कोटी रुपये वाचले होते.

पगारात किती वाढ होणारजास्तीत जास्त पगाराबाबत मोजायचं झालं तर ५६,९०० रुपयांच्या मूळ पगारावर (बेसिक) एकूण वार्षिक DA २,८६,७७६ रुपये होईल. या वेतनश्रेणीत येणाऱ्यांना सध्याच्या दराने म्हणजेच ३८ टक्के डीए म्हणून २,२७६ रुपये अधिक मिळतील. या डीए वाढीच्या घोषणेसह, त्याची मासिक डीए रक्कम २३,८९८ रुपये होईल. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार