शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची जवानांसोबत दिवाळी साजरी

By admin | Updated: November 12, 2015 00:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षीही भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अमृतसरमधील खासा येथील डोगराई युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले.

अमृतसर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या वर्षीही भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. अमृतसरमधील खासा येथील डोगराई युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले. भारतीय फौजांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी या ठिकाणी युद्ध जिंकले होते. हे अत्यंत कठीण रणांगण मानले जाते. तसेच अमृतसर-खेमकरन मार्गावरील वालतोहा नजीकच्या असल उत्तर स्मारकालाही भेट देऊन परमवीरचक्र क्वॉर्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.शौर्य आणि चारित्र्यामुळे अवघे जग भारताकडे अत्यंत आदराने पाहते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. माजी सैनिकांचे वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन चालू असताना पंतप्रधानांनी हे विधान केले. मागच्या वर्षी त्यांनी सियाचीनमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.१९६५ मध्ये असल उत्तर लढाईत अब्दुल हमीद यांनी गंभीर जखमी असतानाही एकट्यानेच शत्रूंचे तीन रणगाडे उद्ध्वस्त करून आक्रमण रोखण्यात मोठी मदत केली, असा उल्लेखही पंतप्रधानांनी यावेळी केला. नंतर टिष्ट्वटवर त्यांनी म्हटले की, अब्दुल हमीद यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करतो. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले. खासा येथे जवानांपुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो असून ही संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. शौर्य, त्याग आणि स्वप्नामुळे जग भारताकडे आदराने पाहते. हे केवळ गणवेशामुळेच नव्हे, तर सशस्त्र दलाच्या चारित्र्यामुळे होय. सशस्त्र दलातील नेत्यांनी सशस्त्र दलाचे संगोपन केल्यामुळे भारताची मान गौरवाने उंच राहते.