सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 06:37 IST2026-04-04T06:37:11+5:302026-04-04T06:37:11+5:30

नववीसाठी गणित, विज्ञान विषयांना द्विस्तरीय प्रणाली

CBSE Implements Three Language Formula from Class 6 | सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू

सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नवीन अभ्यासक्रम जाहीर केला असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी आणि इयत्ता नववीसाठी गणित व विज्ञानाची द्विस्तरीय प्रणाली लागू करण्यात येणार आहे. ही माहिती 'सीबीएसई'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत (एनईपी) बंधनकारक असलेले त्रिभाषा सूत्र २०२६पासून इयत्ता सहावीमध्ये लागू केले जाईल, तर गणित आणि विज्ञान विषयांमध्ये अनिवार्य मानक (स्टैंडर्ड) आणि ऐच्छिक प्रगत (अॅडव्हान्स्ड) अभ्यासक्रमांची द्विस्तरीय प्रणाली इयत्ता नववीपासून लागू केली जाईल.

त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आर१, आर२, आर३ या टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या शिफारशींनुसार, या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे, असे 'सीबीएसई'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गणित आणि विज्ञानातील दोन-स्तरीय प्रणाली (स्टैंडर्ड आणि प्रगत) २०२६-२७शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीसाठी अंमलात येईल. त्या पद्धतीनुसार इयत्ता १०ची पहिली बोर्ड परीक्षा २०२८मध्ये घेतली जाईल.

अशी असेल गणित, विज्ञानासाठी द्विस्तरीय प्रणाली

गणित व विज्ञान विषयांमध्ये द्विस्तरीय प्रणाली लागू करून मोठा संरचनात्मक बदल करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थी स्टैंडर्ड अभ्यासक्रमाचा अभ्यास करतील आणि ८० गुणांच्या तीन तासांच्या परीक्षेला बसतील. या दोन विद्ययापैकी एक किंवा दोन्ही विषयांमध्ये अतिरिक्त 'प्रगत' स्तर निवडण्याचा पर्याय असेल.

प्रगत स्तरासाठी स्वतंत्र २५ गुणांची, एक तासाची परीक्षा असेल, जी उच्चस्तरीय विचारक्षमतेचे परीक्षण करेल. समान परीक्षा देणे अनिवार्य, y तर प्रगत स्तराची परीक्षा ऐच्छिक राहील. प्रगत परीक्षेचे गुण टक्केवारीत जोडले जाणार नाहीत. ५०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत प्रगत स्तर पात्रता स्वतंत्र नमूद केली जाईल.

परदेशी शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांना कोणती सूट ?

'सीबीएसई'च्या अधिकाऱ्याने सांगितले की, सामान्यतः समान भाषिक योजना राबविणे अपेक्षित आहे. परंतु असे असले तरी परदेशी शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी किंवा नववीपर्यंत शिकलेली तिसरी भाषा देशांतर्गत शाळांमध्ये उपलब्ध नसल्यास, अशा विद्यार्थ्यांना सूट दिली जाऊ शकते. मात्र, अशा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार ठरवलेली एकूण विषयसंख्या शिकणे आवश्यक असेल.
 

Web Title : सीबीएसई कक्षा 6 से त्रिभाषा सूत्र लागू करेगा; इसी वर्ष से निर्णय लागू

Web Summary : सीबीएसई 2026-27 से कक्षा 6 में त्रिभाषा सूत्र लागू करेगा। गणित और विज्ञान के लिए दो-स्तरीय प्रणाली कक्षा 9 से शुरू होगी। तीन भाषाओं में से दो भारतीय होनी चाहिए। विदेशी छात्रों को विशेष परिस्थितियों में भाषा में छूट मिल सकती है।

Web Title : CBSE to Implement Three-Language Formula from Class 6 Onward

Web Summary : CBSE will introduce the three-language formula in Class 6 from 2026-27. A two-tiered system for math and science will begin in Class 9. Two of the three languages must be Indian. Foreign students may receive language exemptions under specific conditions.