cbi team questions tmc leader abhishek banerjees wife in coal scam | पश्चिम बंगालमध्ये 'संजय राऊत' प्रकरणाची पुनरावृत्ती; भाजपला फायदा होणार की तोटा..?

पश्चिम बंगालमध्ये 'संजय राऊत' प्रकरणाची पुनरावृत्ती; भाजपला फायदा होणार की तोटा..?

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election) अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासोबतच राजकीय नेत्यांकडून पक्षांतरदेखील जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्षात (BJP) थेट संघर्ष होणार आहे. त्याची झलक काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडी महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच घडल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांवर नवी जबाबदारी; ‘जय श्री राम’च्या जयघोषात भाजपानं सुरू केली तयारी

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. पश्चिम बंगालमध्येदेखील सध्या हाच मुद्दा गाजत आहे. कोळसा घोटाळ्यात तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना सीबीआयनं (CBI) समन्स बजावलं होतं. आज सीबीआयनं त्यांची दीड तास चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचं पथक रुजिरा यांच्या घरातून निघालं. रुजिरा यांच्या चौकशीतून सीबीआयला समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे सीबीआयकडून पुन्हा रुजिरा यांची चौकशी होऊ शकते.

"ये बंगाल भाजपा है…और यहा उनकी Pawri हो रही है", TMC ने रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला सणसणीत टोला

अभिषेक बॅनर्जींप्रमाणेच राऊत यांच्या पत्नीलाही नोटीस
गेल्या वर्षाच्या अखेरीस शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचलनालयानं (ED) नोटीस बजावली होती. त्यानंतर वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात गेल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी केली. यावरून महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातलं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ईडीचा वापर होत असल्याचं, ईडी, सीबीआय भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.

"आधी अभिषेकशी लढा, मग माझा सामना करा"; ममतांचं अमित शहांना खुलं आव्हान

पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारख्याच घडामोडी
अभिषेक बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे आहेत. ते तृणमूलचे खासदार आहेत. संजय राऊत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय राऊत खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा राजकारणात सक्रिय नाहीत. राऊत यांच्या पत्नी वर्षादेखील राजकारणात सक्रिय नाहीत. 

शरद पवार, ईडी अन् राज्यात सत्तांतर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी ईडीनं शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव ईडीच्या नोटिशीत आलं होतं. त्यानंतर पवार स्वत:चं ईडीच्या कार्यालयात पोहोचले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर आले. याचा राजकीय लाभ राष्ट्रवादीला झाला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि पवार यांच्यात याचवेळी बऱ्याच भेटीगाठी झाल्या. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत घरोबा केला आणि सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: cbi team questions tmc leader abhishek banerjees wife in coal scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.